IPL 2023 : विराट कोहलीचे ‘महाविक्रमी’ शतक, मुंबई इंडियन्समध्ये भीतीचे वातावरण!

WhatsApp Group

IPL 2023 RCB vs GT Virat Kohli Century : RCBचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीची बॅट आयपीएल 2023 मध्ये जोरदार तळपत आहे आणि त्याने या हंगामातील शेवटच्या लीग सामन्यात म्हणजेच 70 व्या सामन्यात इतिहास रचला. कोहलीने गुजरात टायटन्सविरुद्ध शतक झळकावले आणि त्याच्या आयपीएल क्रिकेट कारकिर्दीतील हे 7 वे शतक ठरले. यासह, तो या लीगमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बनला आणि त्याने ख्रिस गेलचा विक्रम मोडला.

गुजरातविरुद्धच्या निर्णायक सामन्यात विराट कोहली हार्दिक पांड्याच्या संघासोबत एकटा लढताना दिसला. या सामन्यात कोहली कर्णधार फाफ डुप्लेसिससोबत सलामीला आला आणि दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी झाली. यानंतर डुप्लेसिस 28 धावा करून बाद झाला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आला आणि त्याने 11 धावा केल्या तर लोमरर एक धावा काढून बाद झाला. यानंतर ब्रेसवेल 26 धावा आणि दिनेश कार्तिक खाते न उघडता बाद झाला, पण कोहली दुसऱ्या टोकाला उभा राहिला आणि धावा करत राहिला. 20 षटकात बंगळुरूने 5 बाद 197 धावा केल्या. विराटने 13 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 101 धावा केल्या. बंगळुरूने हा सामना जिंकला, तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरतील, नाहीतर मुंबई इंडियन्स पुढे जाईल.

हेही वाचा – ‘या’ देशाच्या विमान कंपनीने आपल्याच राष्ट्रपतींवर घातली बंदी! जाणून घ्या कारण

विराटचा विक्रम

यानंतर त्याने आपल्या संघासाठी 60 चेंडूत शतक झळकावले आणि हे त्याचे सातवे शतक ठरले. त्याने या लीगमध्ये एकूण 6 शतके झळकावणाऱ्या ख्रिस गेलला मागे टाकले. आता या लीगमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहली पहिल्या क्रमांकावर आला असून ख्रिस गेल दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.

Leave a comment