

IPL 2024 SRH vs MI : सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. आयपीएल 2024च्या पाचव्या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी आक्रमक कामगिरी करत 20 षटकांत तीन गडी गमावून 277 धावा केल्या. हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेडने 62, अभिषेक शर्माने 63, एडन मार्करामने 42 आणि हेनरिक क्लासेनने 80 धावा केल्या. या सामन्यात मार्कराम आणि क्लासेन नाबाद राहिले. या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी एकूण 18 षटकार ठोकले.
आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या
277/3 – SRH vs MI, Hyderabad, 2024
263/5 – RCB vs PWI, Bengaluru, 2013
257/5 – LSG vs PBKS, Mohali, 2023
248/3 – RCB vs GL, Bengaluru, 2016
246/5 – CSK vs RR, Chennai, 2010
हेही वाचा – IPL 2024 : रोहित शर्माची डबल सेंच्युरी..! असा कारनामा करणारा मुंबई इंडियन्सचा पहिलाच खेळाडू
दोन्ही संघांची Playing 11
मुंबई इंडियन्स – इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कप्तान), टिम डेविड, जेराल्ड कोएत्झी, शम्स मुलानी, पीयुष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका.
सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कप्तान), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा