लिओनेल मेस्सी महाराष्ट्रात येणार! फडणवीसांनाही दिलं खास गिफ्ट… पण तो खरंच कोणासोबत खेळणार? वाचा

WhatsApp Group

Lionel Messi Maharashtra Visit : जगप्रसिद्ध अर्जेंटिनाचा कर्णधार, आणि इतिहासातील सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू म्हणून ओळखला जाणारा लिओनेल मेस्सी डिसेंबर 2025 मध्ये महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. ही माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर दिली आहे.

मेस्सीचा हा दौरा ‘GOAT (Greatest Of All Time) टूर’चा भाग आहे, आणि तो 14 डिसेंबर 2025 रोजी मुंबईत येणार आहे. विशेष म्हणजे, 2011 नंतर मेस्सीचा भारतातला हा पहिलाच दौरा आहे, आणि त्यामुळेच फुटबॉलप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांचा मेस्सीला धन्यवादाचा संदेश

फडणवीसांनी एक्सवर लिहिले, “लिओनेल मेस्सी महाराष्ट्रात येत आहे… आणि माझ्या तरुण मित्रांनो, तो तुमच्यासोबत फुटबॉल खेळणार आहे! मला वैयक्तिकरित्या सही केलेला फुटबॉल भेट दिल्याबद्दल मेस्सीचे आभार.”

हेही वाचा – दोन दिवसांत 1.7 लाख कोटी, एवढी कमाई तर लॉटरीतही होत नाही!

ते पुढे म्हणाले, “14 डिसेंबरला मुंबईत होणाऱ्या GOAT टूरसाठी महाराष्ट्र क्रीडा विभाग, MITRA आणि WIFA यांच्या सहकार्याने राज्यातील 14 वर्षांखालील निवडक फुटबॉलपटूंना मेस्सीसोबत सराव करण्याची संधी दिली जाणार आहे.”

केवळ महाराष्ट्र नव्हे, मेस्सी केरळमध्येही खेळणार

मेस्सीचा दौरा केवळ महाराष्ट्रपुरताच मर्यादित नसून, तो केरळ राज्यालाही भेट देणार आहे. केरळचे क्रीडामंत्री व्ही अब्दुरहिमान यांनी फेसबुकवर माहिती दिली की, नोव्हेंबर 2025 मध्ये FIFA इंटरनॅशनल विंडोदरम्यान, अर्जेंटिनाचा राष्ट्रीय संघ मेस्सीसह एका मैत्रीपूर्ण सामन्यासाठी केरळमध्ये येणार आहे.

मेस्सीचा जागतिक विक्रम

  • मेस्सीने 2022 मध्ये कतारमध्ये FIFA वर्ल्ड कप जिंकला
  • 8 वेळा ‘Ballon d’Or’ (जगातील सर्वोत्तम खेळाडू) पुरस्कार
  • जगभरातील करोडो चाहत्यांचा ‘GOAT’

महाराष्ट्रातील फुटबॉलसाठी ही एक ऐतिहासिक संधी आहे. अनेक युवा खेळाडूंना त्यांच्या आदर्शासोबत खेळण्याचा अनुभव मिळणार आहे, आणि राज्यातील फुटबॉल संस्कृतीसाठी हे एक प्रेरणादायी पाऊल ठरणार आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment