क्रिकेट मॅचमध्ये धक्काबुक्की..! युसुफ पठाण, मिचेल जॉन्सन एकमेकांवर धावले; पाहा VIDEO

WhatsApp Group

LLC 2022 : लिजेंड्स क्रिकेट लीगच्या क्वालिफायर सामन्यात भिलवाडा किंग्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यात चुरशीची लढत झाली. २ ऑक्टोबर रोजी झालेल्या या सामन्यात धावांचा पाऊस पडला आणि या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ४५० हून अधिक धावा केल्या. सरतेशेवटी येथे इंडिया कॅपिटल्सने बाजी मारली, पण सामन्यातील एका लढतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भिलवाडा किंग्जचा युसूफ पठाण आणि इंडिया कॅपिटल्सचा मिचेल जॉन्सन यांच्यात झालेल्या सामन्यात जोरदार वादावादी झाली. प्रकरण इतके पुढे गेले की मैदानावरच बाचाबाची झाली आणि नंतर पंच आणि इतर खेळाडूंना हस्तक्षेप करावा लागला. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला.

भिलवाडा किंग्जच्या डावातील १९व्या षटकात मिचेल जॉन्सनने युसूफ पठाणला काहीतरी सांगितले, त्यानंतर युसूफने उत्तर दिले. यादरम्यान दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली, परंतु मिशेल जॉन्सनने युसूफ पठाणला धक्काबुक्की केल्याने वाद चिघळला. यानंतर उर्वरित खेळाडू आणि पंचांनी येऊन हस्तक्षेप केला. रिपोर्टनुसार, लिजेंड्स क्रिकेट लीगचे आयोजक चांगलेच संतापले आहेत. असे मानले जाते की मिचेल जॉन्सनवर एक सामन्याची बंदी देखील घातली जाऊ शकते.

हेही वाचा – IND Vs SA : नाकातून रक्त वाहत असतानाही रोहित लावत होता फिल्डिंग…! हिटमॅनचा Video व्हायरल

गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील इंडिया कॅपिटल्सने येथे ४ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भिलवाडा किंग्जने शेन वॉटसनच्या ६५ धावा आणि युसूफ पठाणच्या ४८ धावांच्या जोरावर २२६ धावा केल्या. इंडिया कॅपिटल्सने हे लक्ष्य गाठले, त्यांच्यासाठी रॉस टेलरने ८४ धावांची धडाकेबाज खेळी खेळली. लिजेंड्स क्रिकेट लीगचे क्‍वालिफायर सामने सध्या सुरू आहेत. इंडिया कॅपिटल्सने अंतिम फेरी गाठली आहे आणि एलिमिनेटर सामना ३ ऑक्टोबर रोजी गुजरात जायंट्स आणि भिलवाडा किंग्ज यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ ५ ऑक्टोबरला अंतिम फेरीत इंडिया कॅपिटल्सशी भिडणार आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment