नेपाळचा क्रिकेटर संदीप लामिछानेची निर्दोष सुटका, टी-20 वर्ल्डकप खेळताना दिसणार?

WhatsApp Group

Sandeep Lamichhane : नेपाळ क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू संदीप लामिछाने याच्यावर 18 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला होता. 2022 मध्ये त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर त्याला अटकही करण्यात आली. या वर्षाच्या सुरुवातीला काठमांडू जिल्हा न्यायालयाने लामिछानेला दोषी ठरवले होते. त्याला न्यायालयाने 8 वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर नेपाळ क्रिकेट असोसिएशननेही त्याला निलंबित केले.

निलंबित राष्ट्रीय क्रिकेटपटू संदीप लामिछानेची बुधवारी पाटण उच्च न्यायालयाने लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. न्यायमूर्ती सूर्य दर्शन देव भट्ट आणि अंजू उप्रेती ढकल यांच्या खंडपीठाने काठमांडू जिल्हा न्यायालयाने आठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा रद्द केली. पाटण उच्च न्यायालयाचे प्रवक्ते तीर्थराज भट्टराई यांच्या म्हणण्यानुसार खंडपीठाने पुराव्याअभावी निकाल रद्द केला.

10 जानेवारी रोजी न्यायाधीश शिशिर राज ढकल यांच्या कोर्टाने लामिछाने याला दोषी ठरवले होते. शिक्षा म्हणून त्याला तुरुंगवास आणि पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला. या 5 लाख रुपयांपैकी 3 लाख रुपये दंड आणि उर्वरित रक्कम पीडितेला नुकसानभरपाई म्हणून द्यायची होती. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लामिछाने आणि सरकारी वकील दोघेही उच्च न्यायालयात गेले.

हेही वाचा – एकदम ‘फ्री’ मध्ये पाहता येणार T20 World Cup 2024, हॉटस्टारकडून घोषणा, पण…

यानंतर, 4 नोव्हेंबर 2023 रोजी, काठमांडू जिल्हा न्यायालयाने कोठडी सुनावणीनंतर लामिछानेला सुंधरा येथील मध्यवर्ती कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले. परंतु, 12 जानेवारी 2024 रोजी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ध्रुवराज नंदा आणि रमेश ढकल यांनी तपास सुरू असतानाच त्यांची जामिनावर सुटका केली. सुटकेसाठी त्याला 20 लाखांचा जामीन द्यावा लागला. मात्र, न्यायालयाने त्याला परदेशात जाण्यास मज्जाव केला होता आणि काठमांडूबाहेर गेल्यास प्रथम पोलिसांना कळवा, असे आदेश दिले होते.

परदेश दौऱ्यावरील बंदीबाबत असहमत असलेल्या लामिछानेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तेथे 27 फेब्रुवारी रोजी न्यायमूर्ती सपना प्रधान मल्ला आणि कुमार चुडाल यांच्या खंडपीठाने क्रिकेट खेळण्यासाठी परदेशात जाण्याची परवानगी दिली.

टी-20 विश्वचषक खेळू शकतो लामिछाने..

पुढील महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 विश्वचषक होणार आहे. त्यात नेपाळचा संघही सहभागी होणार आहे. संदीप लामिछानेचा टी-20 विश्वचषकासाठी नेपाळच्या संघात समावेश केला जाऊ शकतो.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment