नाइकीचे ‘माइंड’ शूज खरेच मेंदू जागवतात? दावा, सायन्स आणि मोठा ट्विस्ट जाणून घ्या

WhatsApp Group

Nike Mind Shoes : स्पोर्ट्स जगतात नेहमीच नवे इनोव्हेशन आणि नवे प्रयोग पाहायला मिळतात. पण जगप्रसिद्ध ब्रँड Nike (नाइकी) यावेळी शूजमध्येच न्यूरोसायन्स घालून आणखी एक पायरी पुढे गेलाय. कंपनीने ‘Nike Mind’ नावाने दोन नवे मॉडेल बाजारात आणत असा दावा केला आहे की हे शूज तुमच्या पायांसोबत मेंदूलाही ‘जागं’ करतात.

हो, मेंदू! म्हणजे मैदानात उतरण्यापूर्वी तुम्ही शूज घातले की ते तुमच्या न्यूरल सिस्टमलाच ‘हॅलो’ म्हणत एक्टिवेट करतील. हे ऐकायला अविश्वसनीय वाटतं, पण नाइकीचा दावा तितकाच धडाकेबाज आहे.

नेमकं काय आहे ‘नाइकी माइंड’?

नाइकीने दोन मॉडेल लाँच केले आहेत:

  • Mind 001 – म्यूल टाइप, लेस नसलेले, ग्रे-रेड रंगांत, किंमत सुमारे $95 (₹8,500)
  • Mind 002 – लेस असलेले स्नीकर, किंमत $145 (₹13,000)

हे दोन्ही ‘प्रीगेम शूज’ म्हणून बाजारात येत आहेत. म्हणजे सामना सुरू होण्याआधी किंवा नंतर घालण्यासाठी.

कंपनीचा दावा आहे, की हे शूज तुमचे पाय मग शरीर आणि मग मेंदू ‘री-अवेकन’ करतात.

ते कसं?

शूजच्या तळव्याखाली 22 छोट्या ऑरेंज फोम नोड्स बसवलेले आहेत.
हे नोड्स सामान्य फोम नसून पिस्टन आणि गिंबल सारखे वरखाली हालतात. तुम्ही चाललात की—

  • प्रत्येक नोड वेगळ्या पद्धतीने हलतो
  • पायांना ‘नंगेपणी चालल्यासारखी’ नैसर्गिक फील मिळते
  • पायातील सेंसरी एरिया स्टिम्युलेट होतो
  • त्याचे सिग्नल थेट ब्रेनच्या सेंसरी रिजनला जातात

आणि नाइकीचा दावा आहे की “बूम! मेंदू जागतो, फोकस वाढतो!”

नाइकीची टेस्टिंग, पण पुरावे कुठे?

नाइकीची ‘Mind Science’ टीम म्हणते की:

  • त्यांनी शेकडो अ‍ॅथलीट्सवर हजारो तास टेस्टिंग केली
  • ‘मोबाइल ब्रेन आणि बॉडी इमेजिंग लॅब’ वापरली
  • प्रत्येक नोडची स्पेसिंग ब्रेन-सेंसिंगसाठी खास डिझाइन केली

पण ट्विस्ट असा की अजून कोणताही सायंटिफिक प्रूफ त्यांनी बाहेर शेअर केलेला नाही! नाइकीच्या स्पोक्सपर्सनने सांगितलं, “व्हाइट पेपर दोन आठवड्यांत येईल.” म्हणजे सध्या हे सर्व विश्वास करा किंवा नका करू अशा श्रेणीत.

 हे शूज का बनवले?

नाइकीला मार्केटमध्ये आता तगडी स्पर्धा मिळतेय:

  • Vibram FiveFingers
  • Crocs
  • मिनिमलिस्ट शूज ब्रँड्स

हे सर्व शूज पायांना ‘फ्री’ फील देतात. म्हणून नाइकी आता सेंसरी-अ‍ॅक्टिवेशन फुटवेअर तयार करून वेगळा मार्ग निवडत आहे. नाइकी माइंड सिरीज जानेवारी 2026 पासून विक्रीस येईल.

खरा गेम-चेंजर की मार्केटिंगचा खेळ?

टेक्नोलॉजी नक्कीच आकर्षक वाटते. जणू पाय मेंदूसोबत संवाद साधत आहेत. पण ते खरंच फोकस वाढवेल की फक्त ‘नाइकीचा नवा मार्केटिंग स्टंट’ आहे?

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment