Mizoram Woman Kidney Transplant Pregnancy : मानवी इच्छाशक्ती आणि आधुनिक वैद्यकीय विज्ञानाने काय चमत्कार घडवू शकतात, याचं जिवंत उदाहरण आहे मिझोराममधील 37 वर्षीय ललियानपुई. दीर्घकाळ किडनी फेल्युअरशी लढा देत, दोन किडनी ट्रान्सप्लांट करवूनही तिने नैसर्गिकरीत्या सलग दोन वेळा गर्भधारणा करून सुरक्षित प्रसूती केली.
पहिली गर्भधारणा तिने 2023 मध्ये केली व निरोगी मुलीला जन्म दिला. आणि अवघ्या दोन वर्षांनंतर, 2025 मध्ये पुन्हा नैसर्गिकरीत्या गर्भधारणा केली आणि यावेळी तिने 36+6 आठवड्यांवर 3.2 किलो वजनाच्या निरोगी मुलाला जन्म दिला. दोन्ही गर्भधारणेदरम्यान तिचे किडनी फंक्शन स्थिर राहिले.
दशकभराची आजारपणाशी झुंज
ललियानपुईला 10 वर्षांपूर्वी क्रॉनिक किडनी डिसीज असल्याचे निदान झाले होते.
- पहिले ट्रान्सप्लांट – 2012
- दुसरे ट्रान्सप्लांट – 2020 (ग्राफ्ट रिजेक्शननंतर)
आजन्म इम्युनोसप्रेसिव्ह औषधे, शारीरिक त्रास, मानसिक ताण… सगळं पेलूनही तिने आई होण्याचं स्वप्न जिवंत ठेवलं.
तज्ज्ञांची काटेकोर देखरेख
दोन्ही उच्च-जोखमीच्या गर्भधारणा मणिपाल हॉस्पिटल EM बायपास, कोलकाता येथे डॉ. रोहित रुङ्गटा (नेफ्रोलॉजी) आणि डॉ. शिल्पिता बॅनर्जी (स्त्रीरोग तज्ज्ञ) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. औषधांचे संतुलन, किडनीचे संरक्षण, बाळाच्या वाढीवर सतत लक्ष प्रत्येक गोष्ट अत्यंत नियोजनपूर्वक करण्यात आली.
डॉक्टरांचे मत
डॉक्टर म्हणतात, “किडनी ट्रान्सप्लांट झालेल्या महिलेस गर्भधारणा होणं दुर्लभ आणि गुंतागुंतीचं असतं. पण दोन ट्रान्सप्लांटनंतर दोन नैसर्गिक गर्भधारणा हे अतिशय असामान्य आणि प्रेरणादायी उदाहरण आहे. ट्रान्सप्लांटनंतर सलग दोन गर्भधारणा सांभाळणे खूप आव्हानात्मक होते. तिचं धैर्य आणि आमच्यावरचा विश्वास हेच तिच्या यशाचे खरे कारण.”
हेही वाचा – ब्राझिलियन मॉडेलच्या नावाने 22 वेळा मतदान? राहुल गांधींचा स्फोटक आरोप!
ललियानपुईची भावनिक प्रतिक्रिया
ललियानपुई म्हणाली, “किडनी फेल्युअर आणि दोन ट्रान्सप्लांटेनंतर मी आई बनेन असं कधी वाटलंच नव्हतं. पण आज माझ्याकडे दोन सुंदर मुलं आहेत. डॉक्टरांनी मला फक्त उपचार नाही, तर आशा आणि आत्मविश्वास दिला.”
प्रेरणादायी उदाहरण
ललियानपुईचा प्रवास chronic illness असलेल्या महिलांसाठी आशेचा किरण आहे. योग्य वैद्यकीय मदत, धैर्य आणि विश्वास असेल तर अशक्यही शक्य होऊ शकतं, तेही दोनदा!
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा