ब्राझिलियन मॉडेलच्या नावाने 22 वेळा मतदान? राहुल गांधींचा स्फोटक आरोप!

WhatsApp Group

Rahul Gandhi On Haryana Fake Votes : 2024 च्या हरयाणा विधानसभा निवडणुकीत मतचोरीचा ‘मोठा घोटाळा’ झाला, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. दिल्लीतील पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक आयोग (ECI) आणि BJP वर थेट बोट ठेवत म्हटले की, राज्यात तब्बल 25 लाख बनावट मते नोंदवली गेली, म्हणजेच राज्याच्या एकूण मतदारसंख्येच्या सुमारे 12 टक्के.

राहुल गांधी म्हणाले, “हरयाणात 2 कोटी मतदार आहेत. त्यापैकी 25 लाख बनावट आहेत. आमच्या तपासणीत 5.21 लाख डुप्लिकेट एन्ट्री आढळल्या. म्हणजे प्रत्येक आठ मतदारांपैकी एक मतदार बनावट.”

यावेळी त्यांनी काही स्लाइड्स सादर केल्या ज्यात धक्कादायक उदाहरण दाखवले गेले. ब्राझीलच्या एका मॉडेलचा फोटो मतदार यादीत वेगवेगळ्या नावांनी ‘सीमा’, ‘स्वीटी’, ‘सरस्वती’ असे वापरून 22 वेळा मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा – ट्रॉफीपेक्षा मौल्यवान क्षण.., विश्वविजेती कॅप्टन हरमनप्रीत कौरचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय!

Congressचा विजय पराभवात बदलला

राहुल गांधी म्हणाले, “एक प्लॅन राबवून काँग्रेसचा भक्कम विजय पराभवात बदलण्यात आला. एक्झिट पोल्समध्ये आमचा विजय दिसत होता. पोस्टल बॅलेट्सही यावेळी जुळले नाहीत. पहिल्यांदाच असे घडले.” त्यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांच्यावरही अप्रत्यक्ष टोला लगावला आणि निवडणुकीनंतरच्या त्यांच्या व्हिडिओचा उल्लेख करत, “‘व्यवस्था’ बद्दल त्यांचा चेहरा खूप काही सांगतो,” असे म्हटले.

BJP समर्थकांचे डबल मतदान?

राहुल गांधींचा दावा, “BJP चे हजारो कार्यकर्ते UP आणि हरयाणा दोन्ही ठिकाणी मतदान करताना दिसले.” एका घरात 66 मतदार नोंदवले असल्याचा, तर एक व्यक्तीच्या पत्त्यावर 500 मतदार नोंदी असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. ‘House No. Zero’ पत्त्यावर नोंदवलेल्या मतदारांची चौकशी केल्यावर ते त्यांच्या घरी राहत असल्याचे समोर आल्याचा दावा त्यांनी केला.b“मुख्य निवडणूक आयुक्त जनतेला चुकीची माहिती देत आहेत,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

“आता लक्ष्य बिहार?”

राहुल गांधींचा इशारा, “Biharमध्येही अशीच ‘सरकार चोरी’ची तयारी सुरू आहे. तिथेही हजारो मतदार काढून टाकले गेले.” त्यांनी म्हटले की, काँग्रेसला मतदार यादी शेवटच्या क्षणी मिळते, त्यामुळे विरोध नोंदवण्यास वेळ मिळत नाही.

ECIचे प्रत्युत्तर

निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी राहुल गांधींचे दावे फेटाळले. “हरयाणात मतदार यादीविषयी एकही अपील दाखल झालेले नाही. 90 पैकी फक्त 22 निवडणूक याचिका आहेत,” असे त्यांनी सांगितले. तसेच, “डुप्लिकेट मतदार होतेच तर त्यांनी कोणाला मतदान दिले हे राहुल गांधी सांगू शकत नाहीत,” असेही आयोगाचे म्हणणे आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment