ट्रॉफीपेक्षा मौल्यवान क्षण.., विश्वविजेती कॅप्टन हरमनप्रीत कौरचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय!

WhatsApp Group

Harmanpreet Kaur Emotional Moment With Father : भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. 1973 पासून चालत आलेल्या दीर्घ प्रतीक्षेला अखेर विराम देत भारतीय महिला संघाने वनडे वर्ल्डकप जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम साधला. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळलेल्या रोमांचक अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत करत पहिल्या ICC महिला वनडे वर्ल्डकपचे विजेतेपद पटकावले.

भारताने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 298/7 असा दमदार स्कोर उभारला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांसमोर टिकता आले नाही आणि संपूर्ण संघ 246 धावांवर बाद झाला. या ऐतिहासिक क्षणानंतर संपूर्ण देशात जल्लोषाचा माहोल निर्माण झाला. पण मैदानावरचा हा विजय जितका भावनिक होता, तितकाच भावनिक क्षण मैदानाबाहेरही पाहायला मिळाला…

हेही वाचा – न्यूयॉर्कला मिळाला पहिला भारतीय वंशाचा मुस्लिम महापौर! झोहरन ममदानींच्या ऐतिहासिक विजयानं अमेरिकन राजकारणात भूकंप

वडिलांच्या मिठीत विश्वविजेती हरमन… संपूर्ण देश अश्रूंमध्ये

विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर मैदानाबाहेर आली आणि थेट आपल्या वडिलांकडे हरमंदर सिंह भुल्लर यांच्याकडे धाव घेतली. त्याक्षणी भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला पिता हरमंदर यांनी जणू लहान मुलीसारखे उचलले आणि घट्ट मिठी मारली. दोघांच्या डोळ्यांत अभिमान आणि आनंदाचे अश्रू होते.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. भारतीय क्रीडा इतिहासात वडील-मुलीच्या नात्याचा असा भावनिक क्षण दुर्मीळच. जेमिमा रोड्रिग्ज, स्मृती मंधाना यांच्यासह अनेक खेळाडूही अश्रूंमध्ये दिसल्या. वर्षानुवर्षांच्या मेहनतीला आणि संघर्षाला अखेर सोन्याचा मुकुट लाभला होता.

“स्वप्ने पाहणे कधी थांबवू नका”

विजयानंतर हरमनप्रीत कौरने देशातील तरुणांना भावूक संदेश दिला. “स्वप्ने पाहणे कधी थांबवू नका. कुठे आणि कधी संधी मिळेल हे आपल्याला सांगता येत नाही.” ती म्हणाली, “लहानपणापासून माझ्या हातात नेहमी बॅट होती. बाबांच्या बॅटने खेळण्यापासून सुरुवात झाली. मला त्या वेळी महिला क्रिकेटची माहितीही नव्हती. पण मी निळी जर्सी घालण्याचे स्वप्न पाहिले… आणि आज ते स्वप्न सत्यात उतरले.”

फक्त क्रिकेट नव्हे, तर देशातील प्रत्येक मुला-मुलीसाठी हरमनप्रीतने आज एक धडा दिला, “स्वप्न मोठं असलं पाहिजे. मेहनत आणि वेळ आपोआप जिंकून देतील.”

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment