Lungi Ngidi Head Injury : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) च्या १९ व्या हंगामात शनिवारी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या सामन्याला गालबोट लागले आहे. दिल्लीचा दक्षिण आफ्रिकी वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी याला क्षेत्ररक्षण करताना डोक्याला दुखापत झाली आहे. मैदानातील परिस्थिती इतकी बिकट होती की, एन्गिडीला नेण्यासाठी थेट मैदानात रुग्णवाहिका बोलवावी लागली. सध्या त्याला दिल्लीतील पुसा रोड येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नेमकी घटना काय?
पंजाब किंग्सच्या डावातील तिसऱ्या षटकात ही घटना घडली. दिल्लीचा फिरकीपटू अक्षर पटेल गोलंदाजी करत होता. पंजाबचा फलंदाज प्रियांश आर्याने एक मोठा शॉट मारला, जो हवेत उंच गेला. मिड-ऑफला तैनात असलेल्या लुंगी एन्गिडीने झेल घेण्यासाठी मागच्या बाजूला धाव घेतली. मात्र, चेंडूचा अंदाज चुकल्यामुळे झेल त्याच्या हातात आला नाही. मागे धावत असताना एन्गिडीचा तोल गेला आणि तो जमिनीवर जोरात आदळला. पडताना त्याच्या डोक्याचा मागचा भाग टणक खेळपट्टीवर (Outfield) जोरात आदळला, ज्यामुळे त्याचे डोकं जमिनीवरून पुन्हा वर उसळले.
हेही वाचा – IPL 2026 : श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्सचा ऐतिहासिक पराक्रम; 265 धावांचा यशस्वी पाठलाग, क्रिकेट जगत थक्क!
Good news
— Mr. Rumi (@Mahsar_khan) April 25, 2026
Lungi Ngidi is stable and set to be discharged soon. Wishing him a speedy recovery!#DCvsPBKS #IPL2026
pic.twitter.com/oRDhsiKRbD
मैदानावरच डॉक्टरांची धावपळ
पडल्यानंतर एन्गिडीने तातडीने आपले डोके धरले आणि तो वेदनेने विव्हळू लागला. काही वेळ तो हालचाल न करता जमिनीवरच पडून राहिल्याने दोन्ही संघांतील खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ आणि टीम डॉक्टर तातडीने मैदानात धावले. एन्गिडी शुद्धीत आहे की नाही हे तपासण्यासाठी सुमारे दोन मिनिटे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
Hope Lungi Ngidi hasn’t suffered anything serious 🤯
— Nandu 🦅 (@NandanNandu69) April 25, 2026
Hope he recovers quickly
Pray for lungi ngidi 🙏
#DCvsPBKS #IPL2026 pic.twitter.com/faYPw9Sf1R
स्ट्रेचर आणि रुग्णवाहिकेचा वापर
दुखापतीचे गांभीर्य ओळखून मैदानावर स्ट्रेचर मागवण्यात आले. एन्गिडीच्या मानेला आणि डोक्याला जास्त धक्का बसू नये म्हणून त्याला ‘नेक ब्रेस’ लावण्यात आले. परिस्थिती गंभीर असल्याचे पाहून मैदानात रुग्णवाहिका बोलावण्यात आली. पंजाब किंग्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनीही मैदानात धाव घेऊन एन्गिडीच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी दिल्लीच्या गोटात चिंतेचे वातावरण होते, तर संपूर्ण स्टेडियममध्ये शांतता पसरली होती.
Lungi Ngidi को कैच लेने के दौरान सिर में गंभीर चोट लगना चिंता का विषय है। हालांकि उन्हें तुरंत अस्पताल पहुंचाया गया, जो राहत की बात है। उम्मीद है चोट ज्यादा गंभीर नहीं होगी और वे जल्द स्वस्थ होकर मैदान पर वापसी करेंगे। pic.twitter.com/MFhuugVGOc
— Nitish Kumar Yadav (@ni30krydv) April 25, 2026
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!