VIDEO : तो रडला, आपणही रडलो..! टेनिस सम्राट रॉजर फेडररचं वादळ अखेर थंडावलं

WhatsApp Group

Roger Federer Final Goodbye : महान टेनिसपटू रॉजर फेडररला कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. लेव्हर कपमध्ये २० वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन फेडररनं त्याचा साथीदार राफेल नदालसह दुहेरीच्या सामन्यात प्रवेश केला. फ्रान्सिस टियाफो आणि जॅक सॉक या अमेरिकन जोडीने नदाल आणि फेडररचा ४-६, ७-६, ११-९ असा पराभव केला. या पराभवासह फेडररची व्यावसायिक टेनिस कारकीर्द संपुष्टात आली. सामन्यानंतर फेडररसोबत नदालही रडताना दिसला. सामना पाहण्यासाठी आलेल्या नोव्हाक जोकोविचलाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.

सामना संपल्यानंतर फेडरर खूप भावूक झाला. फेडरर गेल्या काही वर्षांपासून दुखापतींशी झुंजत होता. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो विम्बल्डन २०२१ नंतर एकही सामना खेळला नाही. नुकतीच त्यानं निवृत्ती जाहीर केली. फेडरर जवळपास २५ वर्षे व्यावसायिक टेनिस खेळला. सप्टेंबर १९९७ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी त्यानं पदार्पण केलं. क्रमवारीत ८०३व्या स्थानावरून प्रवास सुरू करून तो अव्वल स्थानी पोहोचला. फेडरर २३७ आठवड्यांपासून जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. रँकिंगमध्ये सर्वाधिक काळ राहण्याचा त्याचा विक्रम सर्बियन खेळाडू नोव्हाक जोकोविचने मोडला.

हेही वाचा – IND Vs AUS : बुमराहचं यॉर्कररस्त्र..! ‘त्या’ भयानक चेंडूचं ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनकडून कौतुक; पाहा VIDEO

हेही वाचा – दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा वर्गातच मृत्यू! पोलिसांनी म्हटलं…

सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदं जिंकण्याच्या बाबतीत फेडरर तिसऱ्या क्रमांकावर 

रॉजर फेडररनं ऑस्ट्रेलियन ओपन ६ वेळा, फ्रेंच ओपन एकदा, विम्बल्डन ८ वेळा आणि यूएस ओपन ५ वेळा जिंकली आहे. फेडररनं त्याचे शेवटचे ग्रँडस्लॅम जेतेपद २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या स्वरुपात जिंकले. त्यावेळी २० ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकणारा तो पहिला पुरुष खेळाडू ठरला. त्याचा विक्रम राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविचने मोडला. नदालने २२ तर जोकोविचने २१ ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावली आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment