‘सडलेलं अंडं’… शिखर धवनवर आफ्रिदीचा संताप; म्हणतो सामना त्याच्यामुळे रद्द!

WhatsApp Group

Shahid Afridi Statement On Shikhar Dhawan : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि सध्या राजकारणात सक्रीय असलेला शाहीद आफ्रिदी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आला आहे. WCL 2025 (वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स) स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात होणारा सामना रद्द झाला आणि त्यानंतर आफ्रिदीने साऱ्या आरोपांचा बाणं भारतावर, विशेषतः शिखर धवनवर सोडला. “धवन म्हणजे सडलेलं अंडं आहे. त्याने संपूर्ण भारतीय संघाला भडकवलं. त्यामुळे सामना रद्द करावा लागला,” असं आफ्रिदीने स्थानिक मीडियाशी बोलताना म्हटलं.

सामना का रद्द झाला?

20 जुलै रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील बहुचर्चित सामना होणार होता. पण ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतात निर्माण झालेल्या रोषामुळे आणि सोशल मीडियावरील विरोधामुळे भारताने सामना न खेळण्याचा निर्णय घेतला.

काय म्हणाला आफ्रिदी?

“खेळ देशांना एकत्र आणतो. पण एक ‘सडलेलं अंडं’ सगळं बिघडवून टाकतं. शिखर धवनने भारतीय खेळाडूंना भडकवलं आणि संपूर्ण सामना रद्द झाला.”

हेही वाचा – कुत्रा चावत होता, मालक हसत होता! मुंबईतील भीषण घटना कॅमेऱ्यात कैद, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

आफ्रिदी याने धवनला ‘देशासाठी लाजिरवाणी गोष्ट’ असंही संबोधलं. पुढे बोलताना तो म्हणाला, “जर भारतीय संघाला सामना खेळायचा नसेल तर ते घरातच बसले असते. मैदानावर यायची गरज नव्हती. आम्हाला 17-18 हजार प्रेक्षक अपेक्षित होते. हे फक्त क्रिकेटसाठीच नाही, तर दोन्ही देशांसाठी वाईट झालं.”

आफ्रिदीचं दुहेरी धोरण?

हा तोच आफ्रिदी आहे, ज्याने यापूर्वी पाहलगाम हल्ल्यावरून भारतावर गंभीर आरोप केले होते. भारत स्वतःच आपल्याच नागरिकांवर हल्ले करतो आणि नंतर पाकिस्तानवर दोष ढकलतो, असं त्याने म्हटलं होतं. तसेच, वेळोवेळी काश्मीर आणि PoK बाबतही आक्षेपार्ह वक्तव्यं आफ्रिदी करत असतो.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment