

T20 World Cup 2022 IND vs PAK : टी-२० वर्ल्डकपमध्ये महामुकाबल्याला सुरुवात झाली आहे. आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात मेलबर्नमध्ये सामना रंगत आहे. या सामन्यात भारतीय संघाता कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारत-पाकिस्तान सामना म्हटले की सर्वांना उत्सुकता असतेच. शिवाय प्रेक्षकांचा स्टेडियममधील उत्साहही वेगळाच असतो. मॅचपूर्वी जेव्हा देशाचे राष्ट्रगान गायले जाते, तेव्हा अनेकांच्या अंगावर काटा येतो. यावेळी भारतीय संघाचा कप्तान रोहित शर्माची रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
वर्ल्डकप सारख्या स्पर्धेमध्ये आपल्या देशाचे नेतृत्व करणे, यासारखी मोठी गोष्ट नाही. रोहित शर्मा प्रथमच वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. यावेळी त्याच्या तोंडावरील भावना काही वेगळीच होती. राष्ट्रगीत सुरू असताना रोहितच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना होती. कॅमेऱ्यात हा क्षण टिपला गेला आहे.
Rohit Sharma couldn't hold back his tears towards the end of the national anthem . What a moment 🇮🇳❤️ pic.twitter.com/0K28G9zXfK
— ` (@FourOverthrows) October 23, 2022
हेही वाचा – Diwali 2022 : दिवाळीनिमित्त राज्यातील नागरिकांना CM शिंदेंनी दिल्या शुभेच्छा
Captain Rohit and his emotions 🥺🥺#INDvsPAK #T20WorldCup #RohitSharma pic.twitter.com/B6LKMvg6mk
— Wisden India (@WisdenIndia) October 23, 2022
Look at these eyes. Every Indian can relate with Rohit sharma right now. SIap on those who say they play only for money.pic.twitter.com/HAH8myXBsv
— Jahazi (@Oye_Jahazi) October 23, 2022
Goosebumps brother, Rohit Sharma's face gave clear signals of the importance of this fixture. #INDvPAK https://t.co/tFsAt9Og5G
— Aman🥤 (@Amanception) October 23, 2022
दोन्ही संघांची Playing 11 :
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!