

T20 World Cup 2024 Free Live Streaming : आयपीएल 2024 नंतर टी-20 विश्वचषक 2024 सुरू होईल. चाहते मोफत आयपीएलचा आनंद घेत आहेत. पण प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न निर्माण होत होता की ते टी-20 विश्वचषक मोफत पाहू शकणार आहेत, की त्यासाठी त्यांना पैसे खर्च करावे लागतील? तर या प्रश्नाचे उत्तर देताना डिस्ने प्लस हॉटस्टारने एक मोठी घोषणा केली आहे. हॉटस्टारने अधिकृतपणे घोषणा केली आहे की चाहते डिस्ने प्लस हॉटस्टारवर संपूर्ण टी-20 विश्वचषक ‘विनामूल्य’ पाहू शकतील. मात्र एक अट आहे.
वास्तविक, चाहत्यांना फक्त मोबाईलवर टी-20 विश्वचषक विनामूल्य पाहता येणार आहे. याशिवाय टीव्ही किंवा लॅपटॉपसारख्या इतर कोणत्याही उपकरणावर स्पर्धा पाहण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील, जे चाहत्यांसाठी वाईट अनुभव असू शकते. हॉटस्टारने स्पर्धेच्या मोफत लाइव्ह स्ट्रीमिंगसंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन दिसत आहे.
2 जूनपासून या स्पर्धेला सुरुवात
टी-20 विश्वचषक 2024 रविवार, 2 जूनपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात होणार आहे. टीम इंडियाचा वर्ल्डकपमधील पहिला सामना बुधवार, 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेतील गट-अ मध्ये आहे. भारतीय संघाचा ग्रुप स्टेजमधील दुसरा सामना रविवारी 9 जून रोजी पाकिस्तानशी होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विश्वचषक खेळणारी टीम इंडिया न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिला आणि दुसरा सामना खेळणार आहे.
हेही वाचा – SBI FD Rates : देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेची ग्राहकांना भेट, आजपासून मुदत ठेवींवर मिळणार अधिक व्याज!
याआधी झालेल्या 2022 टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला सेमीफायनलच्या पलीकडे प्रगती करता आली नाही. ऑस्ट्रेलियाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत इंग्लंडने टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली होती.
टी-20 विश्वचषक 2024 साठी भारताची टीम
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा