IND vs AFG : नवीन उल हक बॅटिंगला येताच विराट समर्थकांनी केला ‘असा’ प्रकार! पाहा VIDEO

WhatsApp Group

World Cup 2023 IND vs AFG Virat Kohli vs Naveen Ul Haq : क्रिकेटविश्वात विराट कोहली आणि नवीन उल हक यांचा वाद सर्वांनाच माहीत आहे, वर्ल्डकप 2023 मध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दिल्लीत लढत होत आहे. या सामन्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे विराट आणि नवीन यांची उपस्थिती. आयपीएलमध्ये या दोघांचा वाद कमालीचा गाजला होता. त्यानंतर हे दोघे एकत्र मैदानावर कधी दिसले नाहीत. आता वर्ल्डतकपच्या निमित्ताने हे दोघे एकमेकांसमोर उभे ठाकले. दिल्लीत अफगाणिस्तान संघाची फलंदाजी सुरू असताना नवीन उल हक फलंदाजीला आला आणि स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांना त्याला चिडवायला सुरुवात केली.

नवीन उल हक मैदानात येताच चाहत्यांनी ‘कोहली-कोहली’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. नवीनने या सामन्यात नाबाद 9 धावा केल्या. यात एका चौकाराचा समावेश होता.

हेही वाचा – Shardul Thakur : शार्दुल ठाकूरने केले संधीचे सोने, घेतला कमाल कॅच! पाहा Video

भारताला 273 धावांचे आव्हान (IND vs AFG)

वर्ल्डकप 2023 चा 9 वा सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला जात आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमावून 272 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने 80 धावांची शानदार खेळी केली. तर अजमतुल्ला उमरझाईने 62 धावा केल्या. भारताकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 39 धावांत 4 बळी घेतले. हार्दिक पांड्याने 2 बळी घेतले. कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.

दोन्ही संघांची Playing 11 (World Cup 2023 IND vs AFG)

भारत – रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

अफगाणिस्तान – रहमानउल्ला गुरबाज(विकेटकीपर), इब्राहिम झादरान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी(कप्तान), नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, अजमातुल्ला ओमरझाई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment