

World Cup 2023 IND vs AFG In Marathi : पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या सामन्यापूर्वी रोहित शर्माने आपला धडाकेबाज फॉर्म दाखवला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहितने अफगाणिस्तानविरुद्ध (IND vs AFG) ऐतिहासिक शतक झळकावले आणि 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताला सलग दुसरा विजय मिळवून दिला. विश्वचषक 2023 च्या 9व्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माने विक्रमांची रांग लावली
अफगाणिस्तानने दिलेल्या 273 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला (World Cup 2023 IND vs AFG) कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन या सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 156 धावांची भागीदारी केली. रोहितने 63 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक शतके ठोकणारा तो खेळाडू ठरला आहे. या यात त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.
हेही वाचा – VIDEO : पहिलं हस्तांदोलन नंतर गळाभेट…विराट कोहली-नवीन उल हकची नवी सुरूवात!
रोहित 84 चेंडूत 131 धावा करून बाद झाला. यादरम्यान त्याने 16 चौकार आणि 5 षटकार मारले. इशान किशन 47 धावा करून बाद झाला. इशानने 5 चौकार आणि 2 षटकार मारले. विराट कोहलीने 55 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. विराटचे हे विश्वचषकातील आठवे अर्धशतक आहे. श्रेयस अय्यर 25 धावा करून नाबाद परतला. विराटने 55 धावांच्या नाबाद खेळीत 56 चेंडूत 6 चौकार लगावले.
भारताला 273 धावांचे आव्हान (IND vs AFG)
या सामन्यात (IND vs AFG Match News In Marathi) अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमावून 272 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने 80 धावांची शानदार खेळी केली. तर अजमतुल्ला उमरझाईने 62 धावा केल्या. भारताकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 39 धावांत 4 बळी घेतले. हार्दिक पांड्याने 2 बळी घेतले. कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!