VIDEO : पहिलं हस्तांदोलन नंतर गळाभेट…विराट कोहली-नवीन उल हकची नवी सुरूवात!

WhatsApp Group

Virat Kohli Naveen Ul Haq Hugging Marathi News : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर क्रिकेटरसिकांना सुंदर क्षण अनुभवता आले. वर्ल्डकप 2023 (World Cup 2023 IND vs AFG) मध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दिल्लीत सामना खेळला गेला. या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारताचा विराट कोहली आणि अफगाणिस्तानचा नवीन उल हक यांच्यातील सामना, टशन पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. पण आता दोघांमघील भांडण मिटले आहे. सामन्यादरम्यान दोघेही एकमेकांशी हस्तांदोलन करताना आणि गळाभेट करताना दिसून आले.

आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा नवीन उल हक (Virat Kohli and Naveen Ul Haq Marathi News) यांची मैदानात शाब्दिक बाचाबाची झाली होती. दोघांनाही दंड ठोठावण्यात आले होते. यात गौतम गंभीरही विराटशी भांडताना दिसला होता. त्यामुळे विराट विरुद्ध नवीन अशी लढत पुन्हा पाहण्यासाठी लोक या वर्ल्डकपची आतुरतेने वाट पाहत होते.

हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माचे दिल्लीत तांडव, विश्वविक्रमाला गवसणी!

दोन्ही संघांची Playing 11 (IND vs AFG)

भारत – रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

अफगाणिस्तान – रहमानउल्ला गुरबाज(विकेटकीपर), इब्राहिम झादरान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी(कप्तान), नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, अजमातुल्ला ओमरझाई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment