IND vs AUS : 0, 0, 0…भारताचे तीन बॅट्समन शून्यावर बाद, जुन्या रेकॉर्डची पुनरावृत्ती!

WhatsApp Group

World Cup 2023 IND vs AUS : चेन्नईत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाच्या गोलंदाजांनी आपली जबाबदारी समजून कांगारू संघाला 200 धावांत गुंडाळले. यानंतर जेव्हा ऑस्ट्रेलियाला चेंडू मिळाला तेव्हा टीम इंडियाची टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलमडलेली दिसत होती. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांनी रोहित शर्मासह टीम इंडियाच्या तीन फलंदाजांना खातेही उघडू दिले नाही.

या सामन्यात शुबमन गिलच्या जागी इशान किशन कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला आला. इशान मिचेल स्टार्कच्या पहिल्याच चेंडूचा सामना करू शकला. दुसऱ्या टोकाला रोहितही धडपडताना दिसला, जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर रोहित बाद झाला. श्रेयस अय्यरनेही शून्यावर विकेट गमावली. टीम इंडियाच्या या प्रकारानंतर चाहते टीम इंडियावर टीका करताना दिसत आहेत. भारताची ही फलंदाजी पाहिल्यानंतर भारतीय चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. ‘अशा प्रकारे विश्वचषक जिंकणार आहात का?’, असा सवाल चाहते करत आहेत.

हेही वाचा – IND Vs AUS : रोहित शर्माने सोडला सोपा कॅच, जडेजाने दिली ‘अशी’ रिअॅक्शन, पाहा Video

40 वर्षे जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती

टीम इंडियाने 2019 च्या वर्ल्डकपमध्ये शानदार सुरुवात केली होती. पण त्यांचा शेवट खूप वाईट झाला. टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध अशीच सुरुवात केली होती. त्या काळात भारताने अवघ्या 5 धावांवर आपले 3 फलंदाज गमावले होते. आता भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या 2 धावांत आपले 3 फलंदाज गमावले. टीम इंडियासोबत विश्वचषकातील ही दुसरी वेळ आहे, जेव्हा दोन्ही सलामीवीर 0 वर पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. झिम्बाब्वे विरुद्ध 1983 मध्ये भारतासोबत पहिल्यांदाच अशी घटना घडली होती.

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment