World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंड सुसाट, सलग दुसरा सामना जिंकला!

WhatsApp Group

World Cup 2023 NZ vs NED News In Marathi : सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत, न्यूझीलंडने नेदरलँड्सचा 99 धावांनी पराभव करून दुसरा विजय नोंदवला. नेदरलँड्सकडून प्रथम फलंदाजीला आमंत्रण मिळाल्यानंतर न्यूझीलंडने 332 धावा केल्या, तेव्हा सामन्याचा निकाल बऱ्याच अंशी स्पष्ट झाला. नेदरलँड्सची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. भारतीय वंशाचा विक्रमजीत सिंग (12) आणि मॅक्स डाऊड (16) स्वस्तात बाद झाले. इथून कॉलिन एकरमन (69) ने एक टोक धरून चांगली खेळी केली, पण दुसऱ्या टोकाला विकेट पडत राहिल्या. स्कॉट एडवर्ड्स (30) आणि सायब्रँड एंग्लब्रेक्ट (29) यांनी निश्चितपणे प्रयत्न केले, पण हे योगदान अपुरे ठरले. संपूर्ण संघ 46.3 षटकात 223 धावांवर ऑलआऊट झाला. फिरकीपटू मिचेल सँटनरने पाच गडी बाद केले.

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने सात विकेट्सवर 322 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून विल यंगने 70, टॉम लॅथमने 53, रचिन रवींद्रने 51 तर डॅरिल मिशेलने 48 धावा केल्या. नेदरलँड्सकडून पॉल व्हॅन मीकरेन, आर्यन दत्त आणि रोएलॉफ व्हॅन डर मर्वे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. किवी संघाने मागच्या सामन्यात इंग्लंडचा पराभव केला आहे. अशा स्थितीत न्यूझीलंड संघाचे मनोबल वाढले आहे. दुसरीकडे नेदरलँडचा याआधी पाकिस्तानकडून पराभव झाला.

हेही वाचा – BEL Recruitment 2023 In Marathi : भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या डिटेल्स!

दोन्ही संघांची Playing 11 (World Cup 2023 NZ vs NED)

न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.

नेदरलँड्स : विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडॉड, कॉलिन एकरमन, बास डी लीड, तेजा निदामानुरु, स्कॉट एडवर्ड्स (विकेटकीपर), सिब्रांड एंजेलब्रेक्ट, रोएलॉफ व्हॅन डर मार्वे, रायन क्लाइन, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment