World Cup 2023 : पाकिस्तान जिंकली, पण नेदरलँड्सने थकवलं!

WhatsApp Group

World Cup 2023 PAK vs NED News In Marathi : पाकिस्तानने वर्ल्डकपमध्ये विजयी सुरुवात केली आहे. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सचा 81 धावांनी पराभव केला. टॉस गमावलेल्या पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 286 धावा केल्या. त्यांचा संपूर्ण संघ ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात नेदरलँड्सने 205 धावांपर्यंत मजल मारली. त्यांच्याकडून बास डी लीडने सर्वाधिक 62 धावांची खेळी केली आणि गोलंदाजीत 4 विकेट्स घेतल्या.

सर्वांच्या नजरा लागून असलेला बाबर आझम आज सपशेल अपयशी ठरला. त्याला फक्त 5 धावा करता आल्या. नेदरलँड्सकडून लीडने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मोहम्मद रिझवान आणि सौद शकिल यांनी शतकी भागीदारी करत पाकिस्तानची मधली फळी सांभाळली. रिझवान आणि शकील या दोघांनी 68-68 धावांची खेळी केली. हे दोघे बाद झाल्यावर शादाब खान आणि मोहम्मद नवाझ यांनी छोटेखानी भागीदारी करत पाकिस्तानला अडीचशे धावांचा टप्पा ओलांडण्यात मदत केली.

हेही वाचा – केंद्र सरकारची X, YouTube आणि Telegram यांना वॉर्निंग!

प्रत्युत्तरात नेदरलँड्सचा सलामीवीर विक्रमजित सिंगने अर्धशतक झळकावले. त्याने संथ सुरुवात केली, पण लीडसोबत अर्धशतकी भागीदारी करत संघाला शतक ओलांडून दिले. विक्रमजित सिंगने 52 धावा केल्या, तर लीडने 67 धावांची सुंदर खेळी केली. हे दोघे बाद झाल्यावर नेदरलँड्सचा डाव गडगडला.

दोन्ही संघांची Playing 11 (PAK vs NED )

पाकिस्तान – इमाम उल हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाझ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.

नेदरलँड्स – विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडाड, कॉलिन एकरमन, स्कॉट एडवर्ड्स (विकेटकीपर/कर्णधार), बास डी लीड, तेजा निदामनुरु, साकिब झुल्फिकार, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment