

World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 सुरू होण्यासाठी जवळपास दोन महिने बाकी आहेत. यावेळी 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतीय भूमीवर विश्वचषक खेळवला जाणार आहे. या विश्वचषकात सहभागी होणारे सर्व 10 संघ त्यांच्या तयारीला अंतिम रूप देण्यात व्यस्त आहेत. बहुप्रतिक्षित एकदिवसीय विश्वचषक सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
दुसरीकडे, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) या विश्वचषकासाठी बाबर आझमच्या संघासह एक मानसोपचारतज्ज्ञ भारतात पाठवण्याचा विचार करत आहे, जेणेकरुन आपल्या खेळाडूंना दबावाचा सामना करता येईल. पीसीबीचे कार्यकारी अध्यक्ष झका अश्रफ यांच्यासोबत कर्णधार बाबर आझम यांच्या भेटीनंतरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. बाबर सध्या लंका प्रीमियर लीग (LPL) मध्ये कोलंबो स्ट्रायकर्सकडून खेळत आहे.
हेही वाचा – पैशांची गरज असताना FD तोडायची? की त्यावर कर्ज घ्यायचं? पटकन घ्या निर्णय!
पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, झाका अश्रफ यांना वाटते की खेळाडूंसोबत मानसोपचारतज्ज्ञ असणे उपयुक्त ठरेल. विशेषत: जेव्हा ते चांगली कामगिरी करत नसतील किंवा भारत दौऱ्यावर त्यांना बाह्य दबाव जाणवत असेल. 2016 नंतर संघ प्रथमच भारत दौऱ्यावर जात असल्याने मानसोपचारतज्ज्ञाची उपस्थिती पाकिस्तानसाठी फायदेशीर ठरेल, असे ते म्हणाले.
अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा झाका अश्रफ गेल्या वेळी (PCB चे) चेअरमन होते, तेव्हा त्यांनी मकबूल बाबरी या प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञांना खेळाडूंसोबत काम करण्यासाठी बोलावले होते. बाबरी 2012-13 च्या दौऱ्यात टीमसोबत भारतात गेले होते. पीसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 2011 च्या विश्वचषकासाठी पाकिस्तानी खेळाडूंच्या भारत दौर्यापूर्वीच क्रीडा मानसोपचारतज्ज्ञांसोबत एक सत्र आयोजित करण्यात आले होते. पाकिस्तान वर्ल्डकप 2023 चे सामने हैदराबाद, कोलकाता, बंगळुरू, चेन्नई आणि अहमदाबाद येथे खेळणार आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!