Rohit Sharma Most Sixes Record In Marathi : वर्ल्डकप 2023 मध्ये रोहित शर्माने खळबळ उडवून दिली आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खातेही खोलू न शकलेला रोहित अफगाणिस्तानवर (World Cup 2023 IND vs AFG) बरसला आहे. दिल्लीत अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात रोहित शर्माने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला.
रोहित शर्मा (Rohit Sharma News In Marathi) आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार ठोकणारा फलंदाज बनला आहे. या विक्रमात त्याने वेस्ट इंडिजचा स्फोटक आणि माजी खेळाडू ख्रिस गेलला मागे टाकले. गेलच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 553 षटकार आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार (Rohit Sharma Sixes Record)
- 554* – रोहित शर्मा
- 553 – ख्रिस गेल
- 476 – शाहिद आफ्रिदी
- 398 – ब्रेंडन मॅक्युलम
- 383 – मार्टिन गप्टिल
दोन्ही संघांची Playing 11 (World Cup 2023 IND vs AFG)
भारत – रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
अफगाणिस्तान – रहमानउल्ला गुरबाज(विकेटकीपर), इब्राहिम झादरान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी(कप्तान), नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, अजमातुल्ला ओमरझाई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!