

Ireland Farmer Donation : ‘स्वर्गात जायचंय? मग सर्व संपत्ती दान कर!’ असा संदेश जर एखाद्याला स्वप्नात आला, तर तुम्ही काय कराल? पण आयर्लंडमधल्या एका शेतकऱ्याने या स्वप्नावर इतका विश्वास ठेवला की त्याने अक्षरशः आपली 6 कोटी रुपयांची संपत्ती गरीबांना दान करून टाकली. आणि यामुळे आता आयर्लंड सरकारपासून ते कोर्टापर्यंत सगळेच हैराण झाले आहेत.
स्वप्नात देव आला आणि…
या विचित्र प्रकरणाची सुरुवात एका ‘दैवी’ स्वप्नापासून झाली. एका रात्री शेतकऱ्याला स्वप्न पडलं, त्यात देव आला आणि म्हणाला, “तुझं सर्व काही गरिबांना दान कर! स्वर्गात नेईन.” शेतकऱ्याने हे स्वप्न अगदी गंभीरपणे घेतलं. काही दिवसांतच त्याने आपली सर्व मालमत्ता विकून तब्बल 5.8 कोटी रुपये उभे केले आणि ताबडतोब दान सुरू केलं. आत्तापर्यंत तो 3.5 कोटी रुपये दान करुनसुद्धा संपला नाहीये, तो अजूनही फक्त दानाचं स्वप्न पाहतोय.
रस्त्यावरच्या महिलेला 1 लाखचं दान!
स्वप्न आल्यानंतर काही दिवसांत, शेतकऱ्याला रस्त्यावर एक बेघर महिला दिसली. त्याचं मन भरून आलं आणि त्याने तिला थेट 1 लाख रुपये हातावर ठेवले. पुढे तो वेगाने आपली संपत्ती वाटत राहिला. पण इतक्या मोठ्या प्रमाणात दान होऊ लागल्यावर त्याचे बँक खाते ओव्हरड्राफ्टमध्ये गेलं, 65 लाख रुपयांपर्यंत!
हेही वाचा – GST मध्ये मोठा बदल! घर विकत घेणं होणार स्वस्त, मध्यमवर्गीयांसाठी दिलासा
आता कोर्टचं लक्ष, संरक्षक नेमला गेला
ही बाब एवढी गंभीर झाली की आयर्लंड सरकार आणि न्यायालय दोघेही हस्तक्षेप करण्यास भाग पडले. कोर्टाने स्पष्ट केलं की, या शेतकऱ्याला ‘गार्जियन अॅड लिटम’ म्हणजेच एक कायदेशीर संरक्षक देण्यात येणार आहे, जो त्याच्या आर्थिक हितांचं संरक्षण करेल. वकील कैथरीन केलहेलपर यांनी कोर्टात याचिका दाखल करत सांगितलं, “त्यांच्या बँक खात्यांमधून अक्षरशः नोटा बाहेर जात आहेत. आज सकाळीच मला कळलं की एका खात्यात 65 लाखांचं ओव्हरड्राफ्ट आहे. फक्त काही आठवड्यांत त्यांनी पुन्हा 38 लाखांचं दान केलं आहे.”
युरोपियन युनियनचा भाग असल्याने शासन सजग
आयर्लंड हा युरोपियन युनियन (EU) चा भाग आहे आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी EU अत्यंत सजग असतो. त्यामुळेच एका सामान्य शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती बिघडू नये, म्हणून कोर्टाला दखल घ्यावी लागली. सप्टेंबरमध्ये या प्रकरणावर पुढील सुनावणी होणार आहे.
शेवटी प्रश्न पडतो – दान खरंच स्वर्ग घेऊन जातं का?
या कहाणीने जगभरात एक चर्चा सुरू केली आहे, अंधश्रद्धा आणि दानधर्म यातली सीमारेषा किती पुसट आहे? एकीकडे माणूस स्वप्नात पाहिलेलं खरं मानून सर्व काही दान करतोय, तर दुसरीकडे न्यायव्यवस्था आणि सरकार त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!