GST मध्ये मोठा बदल! घर विकत घेणं होणार स्वस्त, मध्यमवर्गीयांसाठी दिलासा

WhatsApp Group

GST Housing Reform : घर विकत घेण्याची योजना आखताय? तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! केंद्र सरकार लवकरच जीएसटी (GST) मध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत असून, त्याचा थेट फायदा घर खरेदीदारांना मिळू शकतो. सरकारने जीएसटीच्या सध्याच्या दरांमध्ये सुसंगतता आणण्याची आणि त्यांना सुलभ बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सध्या घर बांधण्यासाठी लागणाऱ्या सीमेंट, स्टील, टाइल्स, पेंट अशा विविध साहित्यांवर वेगवेगळे GST दर लागतात. उदाहरणार्थ, सीमेंट आणि पेंटवर 28% पर्यंत कर, तर स्टीलसारख्या साहित्यांवर 18% GST आहे. यामुळे संपूर्ण बांधकाम प्रकल्पाचा खर्च वाढतो आणि त्याचा थेट परिणाम घराच्या किंमतीवर होतो. जर हे दर एकसंध आणि कमी झाले, तर बिल्डरचा खर्च कमी होईल आणि याचा थेट फायदा घर खरेदीदारांपर्यंत पोहोचू शकतो.

अफॉर्डेबल हाउसिंगवर (किफायतशीर घरांवर) काय परिणाम?

सध्या अफॉर्डेबल हाउसिंगसाठी फक्त 1% GST दर लागू आहे, त्यामुळे येथे फारसा बदल अपेक्षित नाही. मात्र, जर नवीन प्रणाली अंतर्गत ITC (Input Tax Credit) लागू करण्यात आला, तर बिल्डरचा एकूण खर्च आणखी घटू शकतो. त्यामुळे सामान्य नागरिकांनाही किंमतीत थोडीशी अधिक सूट मिळू शकते.

बांधकाम खर्चात झपाट्याने वाढ, आता मिळणार सवलत?

गेल्या काही वर्षांत घर बांधण्याचा खर्च झपाट्याने वाढलेला आहे. 2019 ते 2024 दरम्यान बांधकाम खर्चात सुमारे 40% वाढ झाली आहे. विशेषतः मागील 3 वर्षांत 27% पेक्षा जास्त वाढ नोंदली गेली आहे. त्यामुळे जर सीमेंट आणि स्टील यांसारख्या मुख्य बांधकाम साहित्यांवरील GST दरात कपात झाली, तर ही घर खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते.

हेही वाचा – सुपारीमुळे कॅन्सर होतो! WHO च्या रिपोर्टमुळे भारतीय शेतकरी चिंतेत

मध्यमवर्गीयांसाठी आनंदवार्ता!

महागाईच्या तडाख्यामुळे त्रस्त असलेल्या मध्यमवर्गीयांसाठी ही योजना एक मोठा दिलासा ठरू शकते. कारण कर कमी झाला की, एकूण प्रकल्प खर्चात घट होते आणि त्यामुळे घराचे अंतिम मूल्य कमी होते. याचा परिणाम म्हणजे, गृहकर्जाची EMI देखील कमी होऊ शकते, जी सध्याच्या काळात खूप महत्त्वाची बाब आहे.

लग्झरी घरांवर काय परिणाम होणार?

मात्र ही प्रणाली सर्वांसाठी लाभदायक असेलच असं नाही. महागड्या, लक्झरी प्रोजेक्ट्ससाठी काही अडचणी निर्माण होऊ शकतात. जर इम्पोर्टेड फिटिंग्स, महागडी फिनिशिंग मटेरियल्स यांना 40% कर स्लॅबमध्ये टाकले गेले, तर बिल्डरला किंमत वाढवावी लागेल किंवा आपला नफा कमी करावा लागेल.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment