

Lucknow Businessman Shoots Himself Viral Video : उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाहजेब शकील (वय ३६), एक रिअल इस्टेट उद्योजक, याने १५ कोटींच्या कर्जामुळे त्रस्त होऊन स्वत:ला संपवलं आहे. त्यापूर्वी त्याने फेसबुकवर एक भावनिक व्हिडिओ शेअर करत आपली व्यथा मांडली, जो आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये शकीलने सांगितले की, तो आपल्या डायबेटीसग्रस्त मुलीसाठी इंसुलिन इंजेक्शन घेण्याइतकेही पैसे उरलेले नाहीत. त्याच्या डोळ्यात अश्रू येतात आणि तो काही नामवंत व्यक्तींना मदतीसाठी साद घालतो.
ऑफिसमध्ये स्वतःवर गोळी झाडूली
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना गुडंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी घडली. शाहजेब याने आपल्या ऑफिसमध्ये सिक्युरिटी गार्डच्या लायसन्सी १२ बोर बंदुकीने स्वतःवर गोळी झाडली.
करोड़ों के कर्ज़ के बोझ से दबे युवक ने की आत्महत्या
— Aaj Ki Khabar (@AajKiKhabarNews) July 9, 2025
गुडंबा के रिंग रोड पर आवास में गोली मारकर की आत्महत्या
आत्महत्या से पहले युवक ने सलमान खान मुकेश अंबानी सहित तमाम बड़े लोगों से परिवार की मदद करने की गुहार लगाई
फेसबुक लाइव पर अपनी पीड़ा बयान कर शाहज़ेब शकील ने की आत्महत्या… pic.twitter.com/2shahNvO3S
हेही वाचा – सर्वात मोठ्या IT कंपनीच्या उत्पन्नात घट, वाचा TCS शेअर अपडेट
फेसबुक ‘लाइव्ह’ आणि भावनिक अपील
शाहजेब शकीलने आत्महत्येपूर्वी फेसबुकवर ‘लाइव्ह’ येऊन त्याच्या आर्थिक अडचणी आणि मानसिक तणाव याबद्दल मोकळेपणाने सांगितले. त्याने आरोप केला की त्याचा बिझनेस पार्टनर सतत त्रास देत आहे आणि त्यामुळे त्याला मानसिक त्रास होत आहे.
पोलीस तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू
लखनऊ पोलिसांनी या घटनेचा एफआयआर नोंदवून चौकशी सुरू केली आहे. अपर पोलीस उपायुक्त पंकज कुमार सिंह यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात हे स्पष्ट झाले आहे की शाहजेब शकील अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात होता.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!