

Rajasthan Dog Killing Viral Video : राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बकरीच्या मृत्यूचा सूड घेतल्याच्या कारणावरून एका व्यक्तीने थेट २५ बेजुबान कुत्र्यांना गोळ्या झाडून ठार केलं. ही हृदयद्रावक घटना नवलगड तालुक्यातील कुमावास गावात २ व ३ ऑगस्ट रोजी घडली.
संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्यात दिसतं की, बाइकवरून आलेले दोन जण गावातील भटक्या कुत्र्यांचा पाठलाग करत आहेत आणि मागे बसलेला आरोपी त्यांना गोळ्या घालतोय. काही क्षणांत गावात कुत्र्यांच्या रक्ताने माखलेल्या शवांचा थरकाप उडवणारा दृश्य दिसून आला.
व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची धावपळ, आरोपी अद्याप फरार
व्हिडिओ सोशल मीडियावर येताच पोलिसांनी तात्काळ दखल घेतली. प्राथमिक चौकशीत आरोपीचं नाव श्योचंद बावरिया असं समोर आलं आहे. तो डुमरा गावचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध प्राण्यांवरील क्रूरता कायदा आणि शस्त्र अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र, तो अजूनही फरार आहे.
राजस्थान के झुंझुनूं ज़िले की नवलगढ़ तहसील के कुमावास गांव में 'बावरी' नामक एक शिकारी ने 25 से अधिक मासूम कुत्तों को बंदूक से गोलियों से मार डाला। यह अमानवीय कृत्य न केवल कानून का उल्लंघन है, बल्कि नैतिकता और मानवता पर भी सवाल खड़े करता है।#Jhunjhunu #AnimalCruelty pic.twitter.com/UuPCQJFzRs
— Report1 Bharat (@Report1Bharat) August 7, 2025
हेही वाचा – हॉटेलचं नाव ‘मुमताज’, जागा तिरुपती मंदिराची, अखेर सरकारनं रद्द केला ‘तो’ प्रकल्प!
झुंझुनूचे एसपी बृजेश ज्योती उपाध्याय यांनी सांगितलं की, व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी एका हेड कॉन्स्टेबलला कुमावास गावात पाठवण्यात आलं असून लवकरच कठोर कारवाई होणार आहे.
“बकरी मेली म्हणून मारलं” की हिशोबासाठी बनवलेलं खोटं कारण
श्योचंदने सांगितलं की गावातील कुत्र्यांनी त्याच्या बकर्यांना मारलं, म्हणून रागाच्या भरात त्याने ही कारवाई केली. पण गावाच्या माजी सरपंचाने हे स्पष्टपणे फेटाळलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, गावात कुठल्याच बकरीला काहीही झालं नाही, आणि श्योचंद हा खोटं बोलून मुआवजा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.
ग्रामीण आणि प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट
ही घटना समजताच गावात तणावाचं वातावरण आहे. प्राणीप्रेमींनी आणि स्थानिकांनी आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, अशा नराधमांना शिक्षा मिळाली नाही, तर अशा घटनांची पुनरावृत्ती होणार.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!