ITR Filing 2025 : सोशल मीडिया इन्फ्लुएंसरसाठी नवीन प्रोफेशन कोड, सरकार घेणार रिटर्न

WhatsApp Group

ITR Filing 2025 : सोशल मीडियावर ब्रँड प्रमोट करून पैसे कमावणाऱ्या इन्फ्लुएंसरसाठी मोठी अपडेट आहे. 2025 पासून इन्फ्लुएंसरना ITR फाईल करताना ‘प्रोफेशन कोड 16021’ वापरावा लागणार आहे. हा कोड फायनान्शियल ईयर 2024-25 (असेसमेंट ईयर 2025-26) साठी लागू असेल.

ITR-3 किंवा ITR-4 भरणाऱ्या सेल्फ-एम्प्लॉयड व्यक्तींना हा कोड वापरणं अनिवार्य आहे. ब्लॉगर्स, यूट्यूबर्स, ऑनलाइन कोच, गिग वर्कर्स यांच्यावर हे नियम लागू होणार आहेत.

ITR कसं भरायचं?

  • वर्षभरात झालेल्या कमाईचा हिशोब ठेवा
  • खर्च आणि डिडक्शनचं गणित करा
  • ITR-3 (वास्तविक इनकम) किंवा ITR-4 (प्रिजम्पटिव) निवडा
  • प्रोफेशन कोड 16021 लिहा
  • डिटेल्स भरून रिटर्न सबमिट करा

हेही वाचा – बँकांची वेळ बदलणार? आठवड्यातून ५ दिवसच काम, सर्व शनिवार सुट्टी होणार? सरकारने दिलं स्पष्टीकरण

 कमाईबाबत अधिक पारदर्शक

कर तज्ञांचं म्हणणं आहे की, ‘प्रोफेशन’ आणि ‘बिझनेस’ यामध्ये अजूनही गोंधळ आहे. जर इन्फ्लुएंसरला ‘प्रोफेशन’ मानलं गेलं, तर सेक्शन 44ADA लागू होईल आणि खर्च/डिडक्शनचा फायदा मिळेल. अन्यथा 44AD लागू होईल.

सरकारच्या या पावलामुळे सोशल मीडिया इन्कमवर कायदेशीर टॅक्स नियंत्रण वाढणार आहे. आता प्रत्येक क्रिएटरला आपल्या कमाईबाबत अधिक पारदर्शक राहावं लागेल.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment