कॉफी शेती : कमी खर्च, मोठा नफा, शेतकऱ्यांसाठी ठरतंय नवं ‘काळं सोनं’!

WhatsApp Group

Coffee Farming Business India : ज्या कॉफीच्या एक कपने आपण आपला दिवस सुरू करतो, तीच कॉफी आता शेतकऱ्यांसाठी “काळं सोनं” ठरत आहे. भारतात पारंपरिक डोंगरी भागांपुरती मर्यादित राहिलेली कॉफी शेती आता देशभरातील तरुण आणि नवउद्योजक शेतकऱ्यांमध्ये नवीन व्यवसायाचा पर्याय म्हणून उदयास येते आहे.

कॉफी : एक नवं बिजनेस मॉडेल

पाणी आणि चहा नंतर जगातील सर्वाधिक वापरले जाणारे पेय म्हणजे कॉफी. ही फक्त एक ड्रिंक नसून, आता ती दीर्घकालीन उत्पन्न देणारं पिक ठरत आहे. भारत हा जगातील सहावा सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश असून, भारतीय कॉफीची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली आहे.

कॉफीला ‘काळं सोनं’ का म्हणतात?

  • ती कमी खर्चात आणि देखभालीसह उगवता येते
  • उत्पन्न वर्षानुवर्षे सुरू राहतं
  • दरवर्षी शाश्वत नफा मिळतो
  • आंतरराष्ट्रीय बाजारात तिची किंमत आणि मागणी दोन्ही जास्त

हेही वाचा – काश्मीरच्या वुलर सरोवरात ३० वर्षांनी पुन्हा उमलली कमळं; स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण

भारतातील प्रमुख कॉफी जाती

1. अरेबिका (Arabica): कॉफीची राणी

  • उत्कृष्ट चव व सुगंध
  • उंच ठिकाणी (1000–1500 मीटर) लागवड
  • जास्त दर मिळवणारी जाती
  • निर्यातीसाठी सर्वाधिक वापर

2. रोबस्टा (Robusta): अधिक उत्पादन, कमी खर्च

  • उष्ण व कमी उंचीच्या भागांत लागवड
  • जास्त कैफीन असलेली जाती
  • इंस्टंट कॉफीसाठी उपयुक्त
  • उत्पादन जास्त, किंमत तुलनेत कमी

कॉफी शेतीमधील कमाई

  • 3–4 वर्षांत फळधारणा सुरू
  • दरवर्षी उत्पादन
  • 1 हेक्टरवर लागवड केल्यास दरवर्षी ₹3 ते ₹5 लाखांपर्यंत उत्पन्न
  • उत्पन्न गुणवत्ता, हवामान व मार्केटवर अवलंबून

भारतात कॉफीची शेती कुठे होते?

  • कर्नाटक (देशातील 70% कॉफी उत्पादन)
  • केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा
  • नवीन प्रयोगात्मक शेती आता महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंडमध्येही

कॉफी शेती का ठरतेय भविष्याचं व्यवसाय मॉडेल?

  • सततची मागणी, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात
  • कमी देखभाल, लांब पल्ल्याचं उत्पन्न
  • जैविक शेती व निर्यात क्षेत्रातील संधी
  • नवीन पिढीसाठी आधुनिक शेतीचा पर्याय

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment