

Maharashtra Gram Panchayat Election 2022 : महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. विविध १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर २०२२ ऐवजी आता १६ ऑक्टोबर २०२२ रोजी मतदान होईल; तर मतमोजणी १४ ऑक्टोबर २०२२ ऐवजी आता १७ ऑक्टोबर २०२२ रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली.
राज्य निवडणूक आयोगाने ७ सप्टेंबर २०२२ रोजी १ हजार १६६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचाही समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार १६ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १७ ऑक्टोबर २०२२ रोजी होईल. मतमोजणीचे ठिकाण व वेळ संबंधित तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने निश्चित करतील, असेही आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
हेही वाचा – फाल्गुनी पाठक-नेहा कक्करची नेमकी भानगड काय? कशाला भांडताहेत दोघी?
निवडणूक आयोगाकडून १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. १८ जिल्ह्यातील ग्रामपंचातींसाठी मतदान होणार आहे.
ठाणे जिल्हा
कल्याण- ७, अंबरनाथ- १, ठाणे- ५, भिवंडी- ३१, मुरबाड- ३५, व शहापूर- ७९.
पालघर जिल्हा
डहाणू- ६२, विक्रमगड- २६, जव्हार- ४७, वसई- ११, मोखाडा- २२, पालघर- ८३, तलासरी- ११ व वाडा- ७०
रायगड जिल्हा
अलिबाग- ३, कर्जत- २, खालापूर- ४, पनवेल- १, पेण- १, पोलादपूर- ४, महाड- १, माणगाव- ३ व श्रीवर्धन- १.
रत्नागिरी जिल्हा
मंडणगड- २, दापोली- ४, खेड- ७, चिपळूण- १, गुहागर- ५, संगमेश्वर- ३, रत्नागिरी- ४, लांजा- १५ व राजापूर- १०.
सिंधुदुर्ग जिल्हा
दोडामार्ग- २ व देवगड- २.
नंदुरबार जिल्हा
अक्कलकुवा- ४५, अक्राणी- २५, तळोदा- ५५ व नवापूर- ८१.
पुणे जिल्हा
मुळशी- १ व मावळ- १.
नाशिक जिल्हा
इगतपुरी- ५, सुरगाणा- ६१, त्र्यंबकेश्वर- ५७ व पेठ- ७१.
सातारा जिल्हा
जावळी- ५, पाटण- ५ व महाबळेश्वर- ६
कोल्हापूर जिल्हा
भुदरगड- १, राधानगरी- १, आजरा- १ व चंदगड- १
अमरावती जिल्हा
चिखलदरा- १.
वाशीम जिल्हा
वाशीम- १.
नागपूर जिल्हा
रामटेक- ३, भिवापूर- ६ व कुही- ८
वर्धा जिल्हा
वर्धा- २ व आर्वी- ७
चंद्रपूर जिल्हा
भद्रावती- २, चिमूर- ४, मूल- ३, जिवती- २९, कोरपणा- २५, राजुरा- ३० व ब्रह्मपुरी- १
भंडारा जिल्हा
तुमसर- १, भंडारा- १६, पवणी- २ व साकोली- १.
गोंदिया जिल्हा
देवरी- १, गोरेगाव- १ गोंदिया- १, सडक अर्जुनी- १ व अर्जुनी मोर- २
गडचिरोली जिल्हा
चामोर्शी- २, आहेरी- २, धानोरा- ६, भामरागड- ४, देसाईगंज- २, आरमोरी-२, एटापल्ली- २ व गडचिरोली- २.
एकूण- ११६६