VIDEO : वेगळीच परंपरा..! नागपंचमीला गाई-म्हशीसारखा चारा खाणारा माणूस पाहिलाय का?

WhatsApp Group

मुंबई : भारत सांस्कृतिकदृष्ट्या खूप वेगळा आहे. गावागावात आपल्याला विविध गोष्टी पाहायला, ऐकायला मिळतात. भारतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा पाळल्या जातात. काहीवेळा काही परंपरा इतक्या विचित्र असतात की त्या जाणुन आश्चर्य वाटतं. अशीच एक परंपरा उत्तर प्रदेशातील महाराजगंजमध्ये जपली जाते. या परंपरेनुसार नागपंचमीच्या दिवशी गाय, म्हशींप्रमाणे एक माणूस चारा खातो. लोकांचा असा विश्वास आहे, की या काळात त्याची वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात. नागपंचमीच्या दिवशी त्या व्यक्तीला पाहण्यासाठी लांबून लोक येतात.

भैंसासूरचा व्हिडिओ व्हायरल!

सोशल मीडियावर एक व्हायरल व्हिडिओ उत्तर प्रदेशातील महाराजगंजमधून समोर आला आहे. यामध्ये चाऱ्यात दिलेला पेंढा खाल्ला जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा चारा गाय-म्हशी नसून एक व्यक्ती खात आहे. एवढेच नाही तर ती व्यक्ती स्वतःला भैंसासुर म्हणवतो. दर तिसऱ्या नागपंचमीला हा भुसा खाणाऱ्या व्यक्तीवर भैंसासुर स्वार होतो. व्हिडिओमध्ये लोक त्या व्यक्तीला फळं खाऊ घालताना आणि आशीर्वाद घेताना दिसत आहेत, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही लोक याला अंधश्रद्धा म्हणत आहेत तर कोणी श्रद्धा म्हणत आहेत.

कोण आहे तो व्यक्ती?

हे प्रकरण महाराजगंजमधील कोल्हुई येथील रुद्रपूर शिवनाथ गावातील आहे. जिथं बुधीराम नावाचा व्यक्ती गेली अनेक वर्षे चारा खाते. बुधीराम हे रोडवेजचे निवृत्त कर्मचारी आहेत. असा दावा केला जातो की अनेक वर्षांपासून नागपंचमी सणाच्या प्रत्येक तिसर्‍या वर्षी बुधीराम म्हशीवर स्वार होतात आणि चारा खाऊ लागतात. नागपंचमीच्या मुहूर्तावर बुधीराम माणसातून प्राणी बनतात. नागपंचमीच्या दिवशी घराबाहेर बांधलेल्या समय मातेच्या मंदिरावर ते बसचाच. लोक फुलं आणि हार घालून स्वागत करतात आणि आशीर्वाद घेतात.

हेही वाचा – अजबच..! गेल्या २२ वर्षांपासून ‘या’ माणसानं अंघोळच केलेली नाही; कारण ऐकाल तर…!

गेल्या ४०-४५ वर्षांपासून बुधीराम यांच्यासोबत हेच घडत आहे. त्यांच्या मते, वर्षभर ते सामान्य असतात आणि जेव्हा भैंसासुर त्याच्यावर स्वार होतो तेव्हा लोक पूजा करतात आणि काही तासांनंतर ते सामान्य होतात. या परंपरेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment