

Sindhdurg Devgad BJP : भाजप नेते नितेश राणे यांनी एक ट्वीट केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमध्ये उद्धव ठाकरे सेनेतील अनेक सरपंच, उपसरपंच आणि उपतालुका प्रमुखांची भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यासंदर्भात नितेश राणेंनी स्वत: ही माहिती दिली. या ट्वीटसोबत राणेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांना टॅग केले आहे.
तत्पूर्वी देवगड तालुक्यातील पडवणे व मळेगाव या दोन ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. या ग्रामपंचायतीमधील पडवणे सरपंचपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पूर्वा बाजीराव जाधव विजयी झाल्या. पडवणे ग्रामपंचायतचे सातही सदस्य बिनविरोध निवडून आले. तर मळेगावमध्ये सात सदस्यांपैकी पाच सदस्य बिनविरोध निवडून आले. सरपंच पदाच्या निवडणुकीची मतमोजणी देवगड तहसील कार्यालयामध्ये झाली.
हेही वाचा – Video : काँग्रेसला नवा ‘कॅप्टन’ मिळाल्यानंतर राहुल गांधींनी ‘असं’ म्हणत जिंकली मनं!
Several Sarpanch,Upsarpanch n uptaluka pramukhs from Uddhav thakre Sena in devgad sindhdurg join @BJP4Maharashtra today. @Dev_Fadnavis @cbawankule pic.twitter.com/WqZKxnYJZH
— nitesh rane (@NiteshNRane) October 19, 2022