सायकलवर फिरणारा ‘अब्जाधीश’! IIT पासून गावात कंपनी स्थापन करणाऱ्या श्रीधर वेम्बू यांची भन्नाट कहाणी

WhatsApp Group

Sridhar Vembu Arattai App : देशभरात सध्या स्वदेशी मेसेजिंग अ‍ॅप ‘Arattai’ ची जोरदार चर्चा सुरू आहे. WhatsApp ला टक्कर देणारे हे अ‍ॅप Apple App Store मध्ये टॉप पोजिशनवर पोहोचले आहे. हे अ‍ॅप विकसित केले आहे Zoho Corporation या भारतीय कंपनीने, ज्याचे संस्थापक आहेत श्रीधर वेम्बू – एक असे व्यक्तिमत्त्व जे जगातील अब्जाधीश असतानाही अतिशय साधे आयुष्य जगतात.

फोर्ब्सच्या 2024 च्या टॉप 100 भारतीय अब्जाधीशांच्या यादीत 51व्या क्रमांकावर असलेल्या श्रीधर वेम्बू यांची सध्याची संपत्ती 5.8 अब्ज डॉलर एवढी आहे. मात्र एवढ्या संपत्ती असूनही ते तमिळनाडूच्या तंजावूर जिल्ह्यातील एका लहानशा गावात राहतात आणि रोजची लोकल ट्रिप सायकलवर करतात!

IIT पासून अमेरिकेतली नोकरी आणि मग गावात परत

श्रीधर वेम्बू यांची शैक्षणिक कारकीर्द अत्यंत उज्ज्वल आहे. त्यांनी IIT मद्रास येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये 1989 साली B.Tech पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी, न्यू जर्सी येथून 1994 मध्ये PhD पूर्ण केली.

त्यानंतर अमेरिकेत त्यांनी Qualcomm या नामांकित कंपनीत सिस्टम डिझाईन इंजिनिअर म्हणून कामाला सुरुवात केली. पण फार काळ त्यांनी तिथे नोकरी केली नाही. त्यांनी भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. विशेष बाब म्हणजे त्यांनी मुंबई किंवा दिल्लीसारख्या मेट्रो शहरात कंपनी सुरु करण्याऐवजी, तमिळनाडूच्या तेनकाशी गावात कंपनी स्थापन केली.

Zoho Corporation ची स्थापना आणि यशाचा प्रवास

1990 च्या दशकात, दोन कुटुंबीय सदस्य आणि तीन मित्रांसोबत मिळून त्यांनी AdventNet नावाने कंपनी सुरू केली, जी पुढे जाऊन Zoho Corporation बनली. ही कंपनी आज जगभरात ओळखली जाते – CRM, Productivity Tools आणि आता Instant Messaging Apps च्या क्षेत्रातही जोहोने आघाडी घेतली आहे.

2004 मध्ये श्रीधर वेम्बू यांनी Zoho University ची स्थापना केली – ज्यामुळे आर्थिक दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर शिक्षणाची संधी मिळाली. आज ही संस्था Zoho Schools of Learning या नावाने कार्यरत आहे.

हेही वाचा – अक्षय खन्ना शुक्राचार्यांच्या भूमिकेत, लूकची होतेय मोठी चर्चा! कोँणता सिनेमा? कधी येतोय?

5.8 अब्ज डॉलर्सची संपत्ती, पण साधं राहणीमान

फोर्ब्सच्या यादीनुसार, 2018 मध्ये श्रीधर वेम्बू आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्ती 1.6 अब्ज डॉलर्स होती. मात्र 2024 पर्यंत ती वाढून 5.8 अब्ज डॉलर्स झाली आहे.

विशेष म्हणजे, एवढा पैसा असूनही श्रीधर वेम्बू सायकलवर फिरतात, गावात राहतात, आणि लोकांमध्ये सहज मिसळून जातात. ते सध्या तंजावूरच्या एका छोट्या घरात राहतात आणि तिथूनच कंपनीच्या धोरणांवर काम करतात.

बहिण राधा वेम्बूही अब्जाधीश

Zoho Corporation च्या यशात राधा वेम्बू यांचाही मोठा वाटा आहे. त्या श्रीधर वेम्बू यांच्या बहिण असून, सध्या त्यांच्याकडे 3.2 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. त्या Zoho Mail विभागाच्या प्रमुख आहेत आणि भारतातील टॉप महिला उद्योजकांपैकी एक मानल्या जातात.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment