

Madhya Pradesh : वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये अंत्यसंस्कारावरून वाद निर्माण झाला. वाद इतका वाढला की मोठा मुलगा वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे करून जाळण्याचा आग्रह करू लागला. हे पाहून गावकऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन हस्तक्षेप केल्यानंतरच मृत व्यक्तीचे अंतिम संस्कार करण्यात आले.
मध्य प्रदेशमधील ताल लिधोरा या गावातील रहिवासी ध्यानी सिंग घोष यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. धाकटा मुलगा दामोदर आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्काराची तयारी करू लागला. माहिती मिळताच गावकरी तसेच नातेवाईक शोकाकुल कुटुंबाच्या घरी पोहोचले.
अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना मोठा भाऊ किशन सिंग घोष आपल्या मुलासह आणि कुटुंबातील सदस्यांसह आला आणि त्यांनी वडिलांचे अंत्यसंस्कार करण्याचा आग्रह धरला. पण धाकट्या भावाने नकार दिला आणि म्हटले की त्याने त्याच्या वडिलांची सेवा केली आहे आणि आता तो अंतिम संस्कार करेल.
कुटुंबातील सदस्यांनी असेही सांगितले की, जेव्हा वृद्ध ध्यानी सिंग यांची प्रकृती शेवटच्या क्षणी बिघडली, तेव्हा त्यांचा मोठा मुलगा किशन आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांची काळजी घेतली नाही. त्यांना सोबतही ठेवलेही नाही. अशा परिस्थितीत, फक्त सेवा करणारा मुलगा दामोदर यालाच अंतिम संस्कार करण्याचा अधिकार दिला पाहिजे. यावरून दोन्ही मुलांमध्ये वाद झाला आणि वडिलांचा मृतदेह तासन्तास घराबाहेर ठेवण्यात आला.
हेही वाचा – बिहारमध्ये काँग्रेस आमदाराच्या मुलाची सरकारी निवासस्थानी आत्महत्या!
हे प्रकरण इतके वाढले की किशनने त्याच्या वडिलांच्या मृतदेहाचे दोन तुकडे करून वेगळे दहन करण्याची मागणी केली. यामुळे सर्वजण अस्वस्थ झाले आणि परिस्थिती शांत न झाल्याने गावकऱ्यांनी पोलिसांना कळवले.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही पक्षांचे समुपदेशन केले. गावकरी आणि कुटुंबातील सदस्यांच्या विनंतीनुसार, धाकटा मुलगा दामोदर याला अंतिम संस्कार करण्याची परवानगी देण्यात आली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आणि कुटुंबातील सदस्यांनी दामोदरसोबत जाऊन वृद्धाच्या मृत्यूच्या 6 तासांनंतर त्यांचे अंतिम संस्कार केल्यानंतरच प्रकरण मिटले.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!