Video : पत्रकारानं ३ मजली घराला बनवलं शेत..! दरवर्षी करतो ७० लाखांची कमाई

WhatsApp Group

Organic Farming : हे सेंद्रिय शेतीचे युग आहे. म्हणजेच या प्रकारच्या शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरली जात नाहीत. अशा उत्पादनांना बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे ग्राहक त्यासाठी चांगली किंमत मोजण्यास तयार आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना होत असल्याचे उघड आहे. उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. सेंद्रिय शेतीतून भाजीपाला पिकवून दरवर्षी ७० लाख रुपये कमावल्याचा दावा केला जात आहे.

व्हिडिओने UNEP चे माजी कार्यकारी संचालक एरिक सोल्हेम यांचेही लक्ष वेधून घेतले. त्यांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. व्हिडिओमध्ये उत्तर प्रदेशातील बरेली येथील पत्रकार रामवीर सिंग आपल्या तीन मजली घरात माती किंवा रसायनांशिवाय भाजीपाला पिकवताना दिसत आहे. ते स्ट्रॉबेरी, फ्लॉवर, भेंडी आणि इतर अनेक फळे आणि भाज्या पिकवतात. त्यांच्या तीन मजली घरात १०,००० पेक्षा जास्त झाडे आहेत.

हेही वाचा – Video : शिवसेना नेत्यावर भरदिवसा गोळीबार! मंदिराबाहेर निदर्शन सुरू असताना…

मातीची आवश्यक नाही

रामवीर यांच्याकडे विम्पा ऑरगॅनिक आणि हायड्रोपोनिक्स नावाची कंपनी देखील आहे, जी दरवर्षी ७० लाख रुपये कमवते. हायड्रोपोनिक्सचा वापर करून त्यांनी आपल्या घराचे फार्ममध्ये रूपांतर केल्याचेही व्हिडिओमध्ये उघड झाले आहे. या तंत्राला मातीची गरज नाही आणि ९०% पाणी वाचवता येते. ही यंत्रणा उभारण्यासाठी रामवीर यांनी इतरांनाही मदत केली आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment