बँकांची वेळ बदलणार? आठवड्यातून ५ दिवसच काम, सर्व शनिवार सुट्टी होणार? सरकारने दिलं स्पष्टीकरण

WhatsApp Group

5 Days Working Banks India : देशातील कोट्यवधी बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! बँका फक्त सोमवार ते शुक्रवारपर्यंतच चालू राहणार? अशी शक्यता निर्माण झाली आहे. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (AIBOC) व इंडियन बँक असोसिएशन (IBA) ने सर्व शनिवार सुट्टीसाठी सरकारकडे प्रस्ताव सादर केला असून, सरकारने यावर विचार सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

सध्या सार्वजनिक बँका दुसऱ्या व चौथ्या शनिवार आणि सर्व रविवारी बंद असतात. मात्र जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर बँका आठवड्यातून फक्त ५ दिवसच उघड्या राहतील. यामुळे बँक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असला तरी सामान्य ग्राहकांना व्यवहारासाठी कमीत कमी दिवस मिळणार आहेत.

सरकार काय म्हणालं?

राज्यसभेत सांसद के. सी. वेणुगोपाल यांनी प्रश्न उपस्थित करताच, सरकारने स्पष्ट केलं की, IBA चा प्रस्ताव अजून विचाराधीन आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत देशातील ९६% पदं भरलेली असून, उर्वरित रिक्त पदं ही निवृत्ती व राजीनाम्यामुळे आहेत.

हेही वाचा – राजा रघुवंशीच्या हत्येवर आधारित ‘हनीमून इन शिलॉन्ग’ चित्रपटाची घोषणा; कथेचा क्लायमॅक्स मात्र थोडा वेगळा!

कधीपासून लागू होणार?

सध्या तरी सर्व शनिवार सुट्टी लागू करण्याची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र सरकार आणि IBA यावर गंभीरपणे विचार करत आहेत, त्यामुळे लवकरच महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

या बदलाचा परिणाम कोणावर?

  • कर्मचाऱ्यांसाठी फायदा: वर्क-लाइफ बॅलन्स, मानसिक आरोग्य सुधारण्याची संधी
  • ग्राहकांसाठी अडचण: व्यवहारासाठी फक्त ५च दिवस
  • प्राइवेट सेक्टरशी सुसंगती: अनेक प्रायव्हेट कंपन्यांमध्ये आधीच ५ दिवस वर्किंग आहे

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment