

Cash In KFC Sandwich Packet : कर्जबाजारी महिलेला KFC च्या चिकन सँडविचच्या पाकिटातून ४३ हजार रुपये मिळाल्याची घटना घडली आहे. ही महिला टेकवे बॅगमध्ये चिकन सँडविच पॅक करून घरी घेऊन जात होती. अचानक मिळालेले पैसे पाहून महिलेनं ते संबंधित लोकांना परत केले. पोलिसांनीही महिलेच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं आहे.
जोआन ऑलिव्हर जॉर्जिया (यूएसए) येथील आहे. दुपारच्या जेवणात चिकन सँडविच खाण्यासाठी तिनं आपलं पार्सल उघडलं. तेव्हा तिला सँडविचच्या खालून एका पाकिटात ४३ हजार रुपये सापडले. डेलीस्टारच्या रिपोर्टनुसार, जोआन सध्या कर्जात बुडाली आहे. त्यानंतरही हे पैसे पाहून तिनं पोलिसांना फोन केला. ”माझ्याकडं शॉपिंगचा पर्यायही होता आणि मी गाडीची टाकीही फूल करू शकली असती”, असं तिनं गमतीनं सांगितलं.
हेही वाचा – VIDEO : खळखळून हसाल..! राजू श्रीवास्तवची भन्नाट क्रिकेट कॉमेंट्री ऐकलीय का?
JoAnn Oliver really could have used the money but talked about why she had to give it back. https://t.co/U94mLWUPbp
— WSB-TV (@wsbtv) September 17, 2022
WSB TV शी झालेल्या संवादात ती म्हणाली, ”मी नोटा मोजायला सुरुवात केली, एकूण ४३ हजार रुपये होते. मी लगेच परत पाकिटात ठेवले. यादरम्यान अधिकारीही तेथे आले होते.” त्याचवेळी, KFC ची ठेव रक्कम चुकून जोआनच्या पाकिटात गेल्याचे समोर आले. पोलिसांनी फेसबुकवर जोआनचे आभार मानले. ”जोआननं केवळ योग्यच केलं नाही तर तिनं मॅनेजरची नोकरीही वाचवली”, असं पोलिसांनी म्हटलं सोशल मीडियावरही अनेक युजर्सनी जोआनच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं आहे.