आधार अपडेटचं नवं संकट! नाव बदलायचंय? आता 700 रुपये मोजा!

WhatsApp Group

Aadhaar update charges 2025 : आधार कार्ड अपडेट करण्याचं काम आता सामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलंच झळ देणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने 1 ऑक्टोबर 2025 पासून नवीन दर लागू केले आहेत, जे थेट 30 सप्टेंबर 2028 पर्यंत लागू राहणार आहेत. या दरांमध्ये काही बदल 2028 मध्ये पुन्हा एकदा पुनरावलोकन केले जाईल.

नवीन दरांनुसार आधारकार्ड धारकांना डेमोग्राफिक (म्हणजे नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल) आणि बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट, डोळ्यांची स्कॅनिंग, फोटो) अपडेटसाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

डेमोग्राफिक अपडेटसाठी नवीन दर

  • 75 रुपये शुल्क लागेल. (पूर्वी 50 रुपये)
  • जर हे अपडेट बायोमेट्रिक अपडेटसोबत केलं, तर वेगळं शुल्क लागणार नाही.

बायोमेट्रिक अपडेटसाठी दर

  • 125 रुपये शुल्क लागेल.
  • यात फिंगरप्रिंट, डोळ्यांचे स्कॅन आणि फोटो बदल यांचा समावेश आहे.

हेही वाचा – कंपनीचं औषध 40 वेळा फेल झालंय… तरी पण तीच कंपनी पुन्हा टेंडर जिंकते, कसल्या जोरावर?

कागदपत्रात (ID/Address Proof) बदल

  • आधार केंद्रावर जाऊन ID/Address अपडेट केल्यास 75 रुपये लागतील (पूर्वी 50 रुपये)
  • myAadhaar पोर्टलवर ही सेवा 14 जून 2026 पर्यंत फ्री आहे.

आधार प्रिंट आउटसाठी दर

  • पहिल्या वेळी प्रिंट – 40 रुपये
  • दुसऱ्यांदा प्रिंट – 50 रुपये

आधार सेवा तुमच्या घरी

UIDAI आता आधार अपडेटसाठी घरोघरी सेवा देणार आहे. यासाठीसुद्धा दर निश्चित केले आहेत:

  • UIDAI प्रतिनिधी घरावर येईल – त्याचा खर्च 700 रुपये (GSTसह).
  • जर त्या घरात आणखी सदस्यांनी आधारसंबंधी सेवा घ्यायची असेल, तर प्रत्येकासाठी 350 रुपये मोजावे लागतील.

मुलांसाठी वेगळे नियम

  • 5 ते 7 वर्षे वयोगट: पहिलं बायोमेट्रिक अपडेट फ्री.
  • 7 ते 15 वर्षे: याआधी 125 रुपये शुल्क होतं, पण आता ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत माफ.
  • 15 ते 17 वर्षे: पहिलं बायोमेट्रिक अपडेट फ्री.

नागरिकांनी काय करावं?

  1. myAadhaar पोर्टल वापरून सेवा फ्रीमध्ये घेता येते – विशेषतः कागदपत्र अपडेटसाठी.
  2. प्रिंटसाठी अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी PDF स्वरूपात आधार डाउनलोड करा.
  3. बायोमेट्रिक अपडेट फ्रीमध्ये करण्याच्या योग्य वयाच्या वेळा लक्षात ठेवा.
  4. एकाच वेळी अनेक अपडेट करणे फायदेशीर ठरू शकते.
  5. घरून सेवा हवी असल्यास, एकत्रित सदस्यांनी अपडेट करून पैसे वाचवता येतील.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment