

Adani Group : शेअर बाजारात सध्या जिथे बहुतांश शेअर्स घसरणीचा अनुभव घेत आहेत, तिथे अदानी ग्रुपने मात्र गुंतवणूकदारांना मोठा धक्का देत जबरदस्त उसळी घेतली आहे. पुण्याच्या सोमवारी आणि त्याआधी शुक्रवार या दोन दिवसांत अदानी ग्रुपच्या कंपन्यांनी एकत्रितपणे 1.7 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे.
या उसळीचं मुख्य कारण ठरलं आहे – SEBI कडून मिळालेली ‘क्लीन चिट’! म्हणजेच अमेरिकेतील हिंडनबर्ग रिसर्चने अदानी ग्रुपवर 2023 च्या सुरुवातीस लावलेले आरोप खोटे ठरले आहेत.
कोणते शेअर्स झाले रॉकेट?
- Adani Power: बीएसईवर तब्बल 19.99% वाढ होऊन 170.15 रुपयांवर पोहोचला, जो की 15 महिन्यांतील उच्चांक आहे.
- Adani Total Gas: 17.49% वाढ
- Adani Green Energy: 8.12% वाढ
- Adani Energy Solutions: 5.67% वाढ
- Adani Enterprises: 4% वाढ
- NDTV: 3.51% वाढ
- Sanghi Industries: 3.29% वाढ
- Adani Ports: 2% वाढ
- ACC आणि Ambuja Cement: प्रत्येकी 2% वाढ
विशेष बाब म्हणजे सेन्सेक्स 500 अंकांनी आणि निफ्टी 131 अंकांनी घसरत असतानाही, अदानी ग्रुपचे शेअर्स रॉकेटसारखे वर गेलेत.
SEBI clears Adani Group in Hindenburg case. What’s next for the markets?#AdaniGroup #SEBI #GautamAdani #StockMarket #BusinessNews #IndiaMarkets pic.twitter.com/zyKYQvsuoa
— TheHawk (@thehawk) September 22, 2025
हेही वाचा – बापर्डे गावात ऐतिहासिक डे-नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा, निधी शाळेसाठी, प्रेरणा संपूर्ण महाराष्ट्रासाठी!
SEBI चा मोठा निर्णय आणि गुंतवणूकदारांचा विश्वास
SEBI च्या अहवालानुसार, अदानी ग्रुपकडून कोणताही गैरव्यवहार किंवा शेअर हेराफेरी आढळून आलेली नाही. त्यामुळेच गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा जागृत झाला असून, त्यांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू केली आहे.
रॉयटर्सच्या अहवालानुसार, ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफरीजने अदानी एंटरप्रायझेसचा टार्गेट प्राईस 3,000 रुपये ठरवला आहे, जो की सध्याच्या दरापेक्षा 25% अधिक आहे.
तसंच, अदानी ग्रुपद्वारे ऑपरेट केलेल्या विमानतळांवर नवीन टॅरिफ लागू होत असून, यामुळे 2027-28 पर्यंत प्रती प्रवासी कमाई 1.5 ते 2.5 पट होण्याची शक्यता आहे.
गुंतवणूकदारांसाठी संदेश
अदानी ग्रुपमधील हा उसळीचा ट्रेंड कायम राहिल का? की पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळेल? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी गुंतवणूकदारांनी या उसळीचा पुरेपूर फायदा घेतला आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा