हॉलिवूड ‘स्टार’ जेनिफर लोपेझनं केलं चौथं लग्न; २० वर्षांपूर्वी झालाय साखरपुडा! पाहा VIDEO

WhatsApp Group

मुंबई : अभिनेत्री-गायिका जेनिफर लोपेझनं अभिनेता बेन ऍफ्लेकशी लग्न केलं आहे. ५२ वर्षीय जेनिफर गेल्या २० वर्षांपासून ४९ वर्षीय बेनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांचे लग्न अमेरिकेतील लास वेगासमध्ये झालं. दोघांचे मध्यंतरी मोठं ब्रेकअप झालं होतं आणि गेल्या वर्षी ते पुन्हा रिलेशनशिपमध्ये आले. एवढेच नाही तर जेलो या नावाने प्रसिद्ध असलेल्या जेनिफरनं तिचे नाव बदलून जेनिफर अॅफ्लेक केलं आहे. या जोडप्यानं २०२२ मध्ये एंगेजमेंट केलं होतं. यानंतर जेनिफर लोपेझ आणि बेन ऍफ्लेक यांनी आपले मार्ग बदलले. त्यानंतर दोघांनी दुसऱ्याशी लग्न केलं आणि त्यांना मुले झाली. दोघे गेल्या वर्षी पुन्हा भेटले आणि एप्रिलमध्ये पुन्हा साखरपुडा केला. जेनिफरचा जवळचा मित्र हेअरस्टाइलिस्ट क्रिस ऍपलटाउननं जेनिफरची एक झलक इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

ख्रिस ऍपलटाउननं जेनिफर लोपेझचा एक साधा पांढरा वेडिंग गाऊनमधील व्हिडिओ शेअर केला, “लग्नाच्या आधीच्या शेवटच्या क्षणाच्या भावना…”, असं ऍपलटाउननं व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. व्हिडिओमध्ये, ऍपलटाउन जेनिफरला कसं वाटतंय हे विचारताना ऐकू येतं. त्यावर ती उत्तर देते, “मला आश्चर्यकारक वाटत आहे.”

ड्रेसबद्दल बोलताना जेनिफर लोपेझ म्हणते, “हा ड्रेस मी माझ्या लग्नाच्या दिवशी परिधान करत आहे.” पीपल मॅगझिननुसार, जेनिफर आणि बेन यांनी एका वृत्तपत्रात त्यांच्या लग्नाची घोषणा केली, त्यानुसार या जोडप्याला नेवाडामध्ये लग्नाचा परवाना मिळाला आणि शनिवारी उशिरा दोघांनी लग्न केलं. लग्नाच्या ककाही तासांनंतर जेनिफरनं आपल्या बेडरुमचा फोटो शेअर केला आहे.

जेनिफरची चार लग्न!

जेनिफर लोपेझ नेहमीच तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यासाठी चर्चेत असते. तिनं आयुष्यात चार लग्न केली आणि तिला दोन मुलं आहेत. १९९७ मध्ये तिनं ओझानी नोआशी पहिलं लग्न केलं. मात्र, हे लग्न अवघ्या वर्षभरातच तुटलं. त्यानंतर तिनं २००१ मध्ये क्रिस जडशी लग्न केले. तीन वर्षांचं हे नातं २००३ मध्ये संपलं. तिनं २००४ मध्ये मार्क अँथनीशी लग्न केले. मार्कशी तिचा विवाह बराच काळ टिकला आणि ती एमे मारिबेल मुनिझ आणि मॅक्सिमिलियन डेव्हिड मुनिझ या दोन मुलांची आई देखील झाली. २०१४ मध्ये ती मार्कपासून वेगळी झाली आणि त्यानंतर बेन ऍफ्लेकनं तिच्या आयुष्यात दार ठोठावलं. बेन देखील घटस्फोटित आहे आणि तीन मुलांचा पिता आहे.

Leave a comment