VIDEO : ‘महाभारत’ युद्धाच्या पहिल्या दिवसाचं LIVE रिपोर्टिंग..! एखाद्या चित्रपटापेक्षाही जबरदस्त; पाहाच!

WhatsApp Group

AI Mahabharat Video : कुरुक्षेत्रातील महाभारत युद्ध किती भीषण होतं, याचं प्रत्यक्ष दृश्य जर आज आपण पाहू शकलो, तर? अशी कल्पना साकारली आहे एका ब्लॉगरने, आणि तेही Artificial Intelligence (AI) च्या माध्यमातून! सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे, ज्यात ब्लॉगरने “महाभारत युद्धाच्या पहिल्या दिवसाची LIVE रिपोर्टिंग” केली आहे.

या व्हिडिओत सुरुवातीला ब्लॉगर म्हणतो, “महाभारत युद्धाचा आज पहिला दिवस आहे…” आणि पुढच्याच क्षणी तो घोड्यावर स्वार झालेला दिसतो. पार्श्वभूमीला रणांगण, धूळ, शंखनाद आणि शेकडो योद्धे, सगळं इतकं वास्तव वाटतं की पाहणारा क्षणभरासाठी 5000 वर्षं मागे गेल्यासारखं जाणवतं.

अर्जुनाचा द्वंद्व आणि श्रीकृष्णांचा गीतेचा उपदेश

कहाणीचा भावनिक टर्निंग पॉइंट तेव्हा येतो, जेव्हा ब्लॉगर कॅमेऱ्याकडे पाहत म्हणतो, “अर्जुन युद्ध करायला तयार नाही!”
यानंतर AI-Generated दृश्यात अर्जुन दुःखी आवाजात म्हणतात, “माधव, समोर माझे आप्त आहेत…” तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, “जर ते तुझे आप्त आहेत, तर तुझ्याविरुद्ध का उभे आहेत अर्जुन?” आणि मग श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेचा उपदेश देताना दिसतात. त्या क्षणी आकाशात विजा चमकतात, मंत्रांचा गजर ऐकू येतो आणि श्रीकृष्णांचे विराट स्वरूप अवतरते. हा दृश्यांश इतका प्रभावी आहे की प्रेक्षकांच्या अंगावर काटा येतो.

हेही वाचा – मृत समजून मुलाचा अंत्यसंस्कार झाला आणि तीन दिवसांनी तोच मुलगा घरात परत जिवंत आला!

 ‘युद्धभूमी’वरून LIVE अपडेट्स

व्हिडिओतील ब्लॉगर सांगतो, “युधिष्ठिरजी कौरवांकडे चालले आहेत, गुरूंना वडिलधाऱ्यांना नमस्कार करत आहेत…”
क्षणातच शंखनाद ऐकू येतो आणि तो म्हणतो, “आता युद्ध अधिकृतरीत्या सुरू झालं आहे, पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतो डे वनचं पूर्ण रण!” व्हिडिओच्या शेवटी तो भावनिक आवाजात म्हणतो, “भगवान श्रीकृष्ण गीतेचा उपदेश देत आहेत… मी तर धन्य झालो!”

सोशल मीडियावर धुमाकूळ

हा एक मिनिटाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (म्हणजेच जुना Twitter) वर @MemesNationwide या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “पाहा, आता मी AI ने महाभारतात पोहोचलो आहे!”
या व्हिडिओला आतापर्यंत 1.63 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि तो ट्रेंडिंग लिस्टमध्ये वेगाने वर जात आहे.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पौराणिक कथा जिवंत करण्याचा हा प्रयोग अनेकांना आश्चर्यचकित करतोय. AI च्या मदतीने आता फक्त भविष्य नाही, तर इतिहासदेखील अनुभवता येतोय आणि महाभारतासारखा थरारक क्षण पुन्हा एकदा जिवंत झाला आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment