World Cup 2023 : वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ‘स्टार’ खेळाडू बाहेर!

WhatsApp Group

Cricket World Cup 2023 : विश्वचषक 2023 सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. डावखुरा फिरकीपटू अॅस्टन अगर (Ashton Agar) दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर आहे. त्याच्या जागी भारतीय वंशाचा लेगस्पिनर तन्वीर संगाला संघात स्थान मिळू शकते. कांगारू संघ दुखापतींशी झुंजत आहे. सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेड दुखापतीमुळे विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमधून आधीच बाहेर गेला आहे. अशा स्थितीत भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत मिचेल मार्शला त्याच्या जागी सलामीची संधी मिळाली. एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा भारताकडून 1-2 असा पराभव झाला.

फॉक्स स्पोर्ट्सच्या म्हणण्यानुसार, दुखापतीमुळे अॅस्टन अगर (Ashton Agar) वर्ल्डकपमधून (World Cup 2023) बाहेर पडला आहे. अलीकडे दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतही सहभागी झाला नव्हता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील एक सामना खेळला असला तरी त्यानंतर तो बाप झाल्यामुळे मायदेशी परतला. यानंतर तो भारताविरुद्धच्या मालिकेतही दिसला नाही. तो पुन्हा जखमी झाल्याची बातमी आहे. आगरने आतापर्यंत 22 एकदिवसीय सामने खेळले असून 21 बळी घेतले आहेत. 31 धावांत 2 बळी ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

हेही वाचा – World Rabies Day : कुत्रा चावल्यानंतर लगेच करा ‘या’ 3 गोष्टी!

क्रिकेट ऑस्ट्रेलिया 29 सप्टेंबर रोजी विश्वचषकासाठी (World Cup 2023) आपला अंतिम संघ घोषित करू शकते. अ‍ॅस्टन अगार व्यतिरिक्त मार्नस लाबुशेनचा यात समावेश होऊ शकतो. लाबुशेनने दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्ध चांगली कामगिरी केली. 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे होणार्‍या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना भारताशी होणार आहे.

अॅशेस मालिकेनंतर पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल यांना दुखापत झाली होती. हे सर्व खेळाडू भारताविरुद्धच्या मालिकेतून परतले. मॅक्सवेलने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही 4 विकेट घेतल्या. सामन्यानंतर त्याने सांगितले की, मी विश्वचषकासाठी सज्ज आहे. तन्वीर संगा बद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत 2 वनडे खेळले आहेत आणि 2 विकेट्स घेतल्या आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment