किती भयानक आहे हे..! बोनेट उघडून ‘तो’ गाडी रिपेअर करत होता, इतक्यात…; पाहा VIDEO

WhatsApp Group

Automatic Car Suddenly Started Moving : अपघात कधीही आणि कुठेही होऊ शकतात. त्यामुळं माणसानं सदैव सावध राहिलं पाहिजे. अनेक अपघात हे छोटे असतात आणि त्यातून लोक शिकतात आणि भविष्यासाठी सतर्क होतात, पण काही अपघात शिकण्याची संधी देत ​​नाहीत. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा अपघात होताना दिसत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती पार्क केलेल्या कारसमोर आली आणि त्याच्यासोबत जे घडलं ते धक्कादायक आहे. एका नेटकऱ्यानं ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ खूपच भयानक आहे. व्हिडीओसोबत दिलेल्या माहितीमध्ये दावा करण्यात आला आहे की, ऑटोमॅटिक गाडीचा ब्रेक लावला नसले, तर त्याच्यासमोर कधीही उभं राहू नका. आपल्या मित्रांना आणि कुटुंबीयांना देखील सतर्क करा.

दुःखद अपघात

व्हिडिओमध्ये दिसणारी कार ऑटोमॅटिक असल्याचा दावा करण्यात आला असून त्यात बिघाड झाल्यामुळं कार आपोआप पुढे सरकली. या व्हिडिओमध्ये एका शेडखाली कार उभी आहे. एक स्त्री एका मुलाला तिच्या मांडीवर घेऊन चालत आहे आणि दोन लोक दिसत आहेत. एक माणूस गाडीत काहीतरी दुरुस्त करण्सासाठी बॉनेट उघडतो आणि पुन्हा आत पाहतो. अचानक कार स्वतःहून पुढे सरकते आणि थेट त्या व्यक्तीला धडकते. कार समोर असलेल्या शटरपर्यंत त्या माणसाला नेते.

हेही वाचा – “जर त्यानं मला…”, CSK च्या खेळाडूचा महेंद्रसिंह धोनीवर खळबळजनक आरोप? वाचा!

या भयानक अपघातानंतर त्या व्यक्तीचं काय झालं असेल, ते कळलेलं नाही, पण ज्याप्रकारे लोक आतून ओरडत आहेत, त्यावरून त्याचा मृत्यू झाल्याचं दिसतं. या व्हिडिओला आतापर्यंत २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि अनेकांनी कमेंट केल्या आहेत. याशिवाय प्रेक्षकांनीही कार रिपेअर करताना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. काही यूजर्सनी ऑटोमॅटिक कार पार्क करताना हँड ब्रेक लावण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे गाडी गिअरमध्ये असली तरी पुढे सरकत नाही.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment