Bank Holidays : काय सांगता..! मे महिन्यात 12 दिवस बँकांना सुट्ट्या; पाहा लिस्ट

WhatsApp Group

Bank Holidays : मे महिन्यात भरपूर सुट्ट्या असतात. शाळा-कॉलेज बंद होणार आहेत, अशातच प्रत्येकजण कुठे ना कुठे फिरण्याचा बेत आखत आहे, मे महिन्यात बँकांनाही दीर्घ सुट्ट्या मिळणार आहेत, त्यामुळे तुम्हाला बँकेचे कोणतेही काम निपटायचे असेल तर ,मग त्वरीत आटपा.. कारण सुट्ट्यांमुळे तुमचे काम अडकू शकते, मे महिन्यात 12 दिवस बँका बंद राहणार आहेत.

मे महिन्यात बँकांना सुट्ट्या

  • 1 मे – सोमवार, महाराष्ट्र दिन / मे दिन
  • 5 मे – शुक्रवार, बुद्ध पौर्णिमा
  • 7 मे – रविवार वीकेंड
  • 9 मे – मंगळवार, रवींद्रनाथ टागोर यांची जयंती (WB)
  • 13 मे – महिन्याचा दुसरा शनिवार
  • 14 मे – रविवार वीकेंड
  • 16 मे – सिक्कीम राज्य स्थापना दिवस
  • 21 मे – रविवार वीकेंड
  • 22 मे – सोमवार महाराणा प्रताप जयंती
  • 24 मे – बुधवार इस्लाम जयंती (त्रिपुरा)
  • 27 मे – चौथा शनिवार
  • 28 मे – रविवार वीकेंड

मे महिन्यात बँकांना 12 दिवसांची सुट्टी असली तरी ऑनलाइन इंटरनेट बँकिंग सेवा सुरू राहतील आणि एटीएमही सुरू राहतील. होय, ग्राहकांना प्रत्यक्षरित्या बँकेतून रोख रक्कम जमा करता येणार नाही आणि काढता येणार नाही, परंतु इंटरनेट सेवा सुरू असल्याने ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही.

हेही वाचा – Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलचे दर अपडेट! SMS द्वारे जाणून घ्या तुमच्या शहरातील तेलाचे दर

RBI कॅलेंडर 

RBI ने बँक सुट्ट्यांचे वर्गीकरण दोन श्रेणींमध्ये केले आहे – राष्ट्रीय सुट्ट्या आणि सरकारी सुट्ट्या. राष्ट्रीय सुट्ट्यांमध्ये तीन प्रमुख दिवसांचा समावेश होतो: प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन आणि महात्मा गांधी जयंती. या दिवशी बँका आणि वित्तीय संस्था व्यवसायासाठी बंद असतात. RBI प्रत्येक महिन्याला सुट्ट्यांचे कॅलेंडर जारी करते. केंद्र आणि राज्य सरकारकडून सरकारी सुट्या दिल्या जातात, अशी माहिती आहे. केंद्रीय सरकारी बँकेच्या सुट्ट्या देशभरात पाळल्या जातात, तर राज्य सरकारी बँकेच्या सुट्ट्या केवळ विशिष्ट राज्यांना लागू होतात.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment