

Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदाच्या गृहकर्ज ग्राहकांना मोठा धक्का बसू शकतो. सार्वजनिक क्षेत्रातील बँक, बँक ऑफ बडोदाने MCLR मध्ये ३५ बेसिस पॉइंट म्हणजेच ०.३५ टक्के वाढ केली आहे. गुरुवार, १२ जानेवारीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. MCLR हा दर आहे ज्याच्या खाली बँक कर्ज देऊ शकत नाही. MCLR वाढल्याने, गृहकर्ज घेणे, कार कर्ज घेणे, व्याज वाढल्याने वैयक्तिक कर्ज महाग होते. यासोबतच तुमचे घर, कार आणि पर्सनल लोनचा ईएमआयही वाढतो.
सर्व BOB कर्ज महाग होणार
बँक ऑफ बडोदाच्या म्हणण्यानुसार, एक वर्षाचा बेंचमार्क MCLR २० बेसिस पॉइंट्सने वाढवला आहे. तो आता ८.३० टक्क्यांवरून ८.५० टक्के झाला आहे. ओव्हरनाइट MCLR ३५ bps ने ७.५ टक्क्यांवरून ७.८५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. एक महिन्याचा MCLR ७.९५ टक्क्यांवरून ८.१५ टक्के करण्यात आला आहे. तीन महिने आणि सहा महिन्यांसाठी MCLR अनुक्रमे ८.०५ टक्के आणि ८.१५ टक्क्यांवरून ८.२५ टक्के आणि ८.३५ टक्के करण्यात आला आहे.
हेही वाचा – महाराष्ट्रातील कुस्तीपटूंसाठी गूड न्यूज..! मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिलं ‘मोठं’ आश्वासन
Bank of Baroda announced an increase in its MCLR by up to 35 basis points across tenors with effect from January 12.#BankofBaroda #MCLR #RBIhttps://t.co/IVF4FRWakB
— Business Standard (@bsindia) January 10, 2023
या वाढीमुळे कॉर्पोरेट कर्जदारांवर परिणाम होऊ शकतो. किरकोळ कर्ज ज्यामध्ये घर, कार, SME, कॉर्पोरेट आणि वैयक्तिक कर्ज यांचा समावेश होतो. ही कर्जे रेपो दराशी निगडीत आहेत. BOBने यापूर्वी डिसेंबरमध्ये ACLR ३० बेसिस पॉइंट्सने वाढवला होता. जानेवारीतील कर्जदरात झालेली वाढ डिसेंबरच्या तुलनेत जास्त आहे. डिसेंबरमध्ये, बेंचमार्क एक वर्षाचा MCLR २५ बेस पॉइंट्स किंवा ०.२५ टक्क्यांनी वाढवून ८.३० टक्के करण्यात आला. रात्रभर दर ७.२५ टक्क्यांवरून ७.५० टक्के करण्यात आला.
अॅक्सिस बँक आणि देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआयने डिसेंबरमध्ये MCLR वाढवला होता. SBI ने MCLR मध्ये १५ बेसिस पॉईंट आणि Axis बँकेने ३० बेसिस पॉईंटने वाढ केली होती. आरबीआय मे महिन्यापासून रेपो दरात सातत्याने वाढ करत आहे. त्यांनी मे ते डिसेंबर या कालावधीत रेपो दरात २२५ बेसिस पॉइंट्स म्हणजेच २.२५ टक्के वाढ केली आहे. RBI ने रेपो रेट वाढवल्यानंतर बहुतांश बँकांनी MCLR वाढवला आहे.