बिहारमध्ये काँग्रेस आमदाराच्या मुलाची सरकारी निवासस्थानी आत्महत्या!

WhatsApp Group

Bihar : बिहारमधून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते शकील अहमद खान यांचा मुलगा अयान (18 वर्ष) याने आत्महत्या केली आहे. मुलाने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. शकील अहमद खान आपल्या कुटुंबासह पाटण्यातील सरकारी निवासस्थानी राहत होता, असे सांगण्यात येत आहे.

रविवारी रात्री (2 फेब्रुवारी) सर्वांनी एकत्र जेवण केले आणि आपापल्या खोल्यांमध्ये झोपायला गेले. मुलगा अयाही त्याच्या खोलीत गेला होता. सकाळी जेव्हा सर्वजण जागे झाले तेव्हा त्यांना अयानचा मृतदेह खोलीतील पंख्याला लटकलेला दिसला. या घटनेमुळे संपूर्ण घरात आरडाओरडा झाला.

हेही वाचा – ‘भारताचे इंजीनियर्स कामचोर, 1 कोटी पगार देऊनही काम करत नाहीत…’

घटनेनंतर कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. एफएसएल टीमला पाचारण करण्यात आले आहे. पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत. ही संपूर्ण घटना सचिवालय पोलीस स्टेशन परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस आमदार सध्या बिहारबाहेर असल्याचे सांगितले जात आहे. कुटुंबातील सदस्यांनी त्यांना फोनवरून या दुःखद घटनेची माहिती दिली.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!  

Leave a comment