Bihar House Roof Collapse : बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील दानापूर भागात रविवारी रात्री घडलेल्या एका भीषण दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. झोपेत असताना एका घराची छत कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मानस गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थ अजूनही धक्क्यात आहेत.
ही घटना रविवार रात्री सुमारे 9.45 वाजताच्या सुमारास मानस गावात घडली. मृतांमध्ये बबलू खान, त्यांची पत्नी रोशन खातून, मुलगा मोहम्मद चाँद, मुलगी रुखशार आणि धाकटी मुलगी चांदणी यांचा समावेश आहे. सर्वजण रात्रीचे जेवण करून झोपले होते, तेवढ्यात अचानक छत कोसळले आणि कुटुंब मलब्याखाली गाडले गेले.
Patna के Danapur में एक मकान की छत गिरने से एक ही परिवार के 5 लोगों की मौत#Patna #Danapur #Bihar@SabeenaTamang | @cmohan_pat pic.twitter.com/I70Nfs5x07
— News18 India (@News18India) November 10, 2025
हेही वाचा – IPL 2026 Auction आधी मोठा बदल! चेन्नई सुपर किंग्जकडून हे 5 खेळाडू होऊ शकतात ‘रिलीज’, पाहा यादी
गावकऱ्यांनी मोठा आवाज ऐकताच मदतीला धाव घेतली, मात्र तोपर्यंत सर्वांचा श्वास थांबला होता. पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे घर इंदिरा आवास योजनेअंतर्गत काही वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या घराच्या छतात भेगा पडल्या होत्या. आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाला दुरुस्ती करणे शक्य झाले नाही. अखेरीस त्याच घराने त्यांचा जीव घेतला.
गावकऱ्यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, या परिसरातील इंदिरा आवास योजनेखाली बांधलेली अनेक घरे सध्या अत्यंत जीर्णावस्थेत आहेत आणि रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने तातडीने अशा घरांची तपासणी करून आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
या दुर्दैवी घटनेने संपूर्ण दानापूर परिसर शोकमग्न झाला आहे. गावातील प्रत्येकाच्या ओठांवर एकच प्रश्न आहे – “जर शासनाने वेळेत लक्ष दिलं असतं, तर या कुटुंबाचा जीव वाचला असता का?”
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा