Viral Video : कारचा दरवाजा उघडणं पडलं महागात..! ट्रकखाली आला बाइकस्वार; पाहा भयानक घटना

WhatsApp Group

Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून सर्वांनी धडा घ्यावा. रस्त्यावर वाहन चालवणाऱ्या प्रत्येकाने अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार चालकाच्या चुकीमुळे दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. काही वेळा चारचाकी वाहनचालकांकडून चुका होतात. त्यामुळे त्यांनी हा व्हिडिओ पाहावा आणि काळजी घ्यावी.

व्हिडिओमध्ये दोन तरुण दुचाकीवरून येत असल्याचे दिसत आहे. दरम्यान रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक कार गेट उघडते. त्यामुळे दुचाकीस्वार टक्कर टाळण्यासाठी रस्त्याच्या दिशेने जातो. त्यामुळे त्याला ट्रकची धडक बसते.

हेही वाचा – Railway Recruitment 2022 : दहावी पास झालेल्यांसाठी रेल्वेत नोकरी..! ‘असा’ भरा अर्ज

कार चालकाचा निष्काळजीपणा

कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे दुचाकीस्वार ट्रकवर आदळले. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी आणि पोलिस उपायुक्त (पूर्व बंगळुरू) कला कृष्णस्वामी यांनी शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की कृपया तुमच्या वाहनाचा दरवाजा उघडताना काळजी घ्या आणि अपघात टाळा.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment