कळलं का..? ‘यंग’ आहात म्हणून काय झालं, ब्लड प्रेशर वयानुसार ‘एवढं’ असावं!

WhatsApp Group

Blood pressure range chart : शरीर निरोगी ठेवण्यासाठी ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब नियंत्रणात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. ह्रदयाच्या आकुंचन पावणं आणि प्रसरण पावणं या तालबद्ध हालचालीमुळं शरीरभर रक्त फिरत असते. हे रक्त वाहताना रक्तवाहिन्यांवर जे प्रेशर पडतं किंबहुना ज्या प्रेशरनं रक्त सर्व शरीरातील रक्तवाहिन्यांतून फिरत असतं त्या प्रेशरला ‘ब्लड प्रेशर’ असं म्हणतात. हल्लीच्या जीवनशैलीमुळं दिवसेंदिवस ब्लड प्रेशरच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळं रुग्णांना इतर आजार होण्याचा धोकाही वाढत चालला आहे. ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी, आपल्याला त्याची रेंज देखील माहीत असणं आवश्यक आहे. कोणत्या रेंजमध्ये ब्लड प्रेशर सामान्य राहतं आणि कधी सामान्य नसतं, हे तुम्हाला या लेखातून कळेल.

९०/६० आणि १२०/८० हे योग्य ब्लड प्रेशर मानलं जातं. १४०/९० हे जास्त ब्लड प्रेशर तर ९०/६० हे कमी ब्लड प्रेशर मानलं जातं. सामान्यत: सामान्य व्यक्तीच्या ब्लड प्रेशरची रेंज १२०/८० च्या आसपास मानली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की वयानुसार ब्लड प्रेशरच्या रेंजमध्ये बदल होत असतात. तसंच, महिला आणि पुरुषांमधील ब्लड प्रेशरची रेंज देखील एकमेकांपेक्षा वेगळी असते. चला तर मग जाणून घेऊया वयाच्या ५०व्या वर्षी रक्तदाब किती असावा.

हेही वाचा – अय्यो..! या ७० वर्षाच्या आजीची ‘बॉडी’ पाहून तुम्हालाही बसेल धक्का; पाहा PHOTO

वयाच्या ५० व्या वर्षी ब्लड प्रेशर किती असावं?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वाढत्या वयानुसार रुग्णांमध्ये ब्लड प्रेशरची रेंजही वाढते. ५० वर्षांच्या पुरुषांच्या ब्लड प्रेशरची रेंज १२८/८५ mm Hg दरम्यान असावी. दुसरीकडं, वयाच्या ५०व्या वर्षी, महिलांची ब्लड प्रेशरची रेंज १२९/८५ mm Hg दरम्यान असावी.

ब्लड प्रेशर वाढण्याची प्रमुख कारणं

रुग्णांमध्ये ब्लड प्रेशरची समस्या वेळोवेळी वाढतच जाते. ब्लड प्रेशर वाढण्‍याची अनेक कारणं आहेत, जसं की जीवनशैली, व्यायामाचा अभाव, याशिवाय लठ्ठपणा आणि मधुमेहाने घेरलेल्या लोकांनाही ब्लड प्रेशरचा त्रास होण्याचा धोका अधिक असतो. ब्लड प्रेशर योग्य प्रमाणात राहणं हे निरोगी आयुष्याचं लक्षण असतं. त्यामुळं आपलं ब्लड प्रेशर आटोक्यात राहावं यासाठी योग्य वेळी योग्य काळजी घेणं आवश्यक आहे,

पाहा वयानुसार ब्लड प्रेशर चार्ट

  •   वय       –  किमान – सामान्य – कमाल
  • ३५ ते ३९ – १११/७८ – १२३ /८२  – १३५/८६
  • ४० ते ४४  – ११२/७९ – १२५/८३ – १३७/८७
  • ४५ ते ४९ – ११५/८० – १२७/८४ – १३९/८८
  • ५० ते ५४ – ११६/८१  – १२९/८५ – १४२/८९
  • ५५ ते ५९ – ११८/८२ – १३१/८६ – १४४/९०
  • ६० ते ६४ –  १२१/८३ – १३४/८७ – १४७/९०

 

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment