Electric Scooter : फक्त ₹499 मध्ये बुक करा ही 115 km रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर!

WhatsApp Group

Electric Scooter : भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेक नवीन कंपन्याही या क्षेत्रात आपला हात आजमावत आहेत. इलेक्ट्रिक टू-व्हीलर ब्रँड बीगौसने (BGAUSS) दिल्लीत तिसरी इलेक्ट्रिक स्कूटर BG D15 लॉन्च केली आहे. यादरम्यान १०० हून अधिक ग्राहकांना या स्वदेशी स्कूटरची टेस्ट राइड देण्यात आली. ही स्कूटर फक्त ४९९ रुपयांमध्ये बुक करता येईल. ही स्कूटर फुल चार्जमध्ये ११५ किमी चालते. एवढेच नाही तर अवघ्या ७ सेकंदात ६० kmph चा वेग गाठता येतो.

‘अशी’ आहेत फीचर्स!

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, सध्याच्या इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये BG D15 ही आपल्या प्रकारची पहिली स्कूटर आहे. BG D15 मध्ये काढता येण्याजोग्या बॅटरी, इन-बिल्ट नेव्हिगेशन, डिजिटल स्पीडोमीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कीलेस स्टार्ट, मोबाइल चार्जिंगसाठी यूएसबी पोर्ट, कॉल आणि नोटिफिकेशन अलर्ट यांसारखे फीचर्स आहेत. इंटेलिजेंट कनेक्टिव्हिटी फीचर्सच्या मदतीने यूजर्स स्मार्टफोनला त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरशी कनेक्ट करू शकतात. चाकण प्लांटमध्ये त्याची डिझाईन आणि डेव्हलपमेंट करण्यात आली आहे.

हेही वाचा – Video : अहमदाबाद विमानतळावर प्रवाशाला हृदयविकाराचा झटका; मग पुढं CISF जवानानं काय केलं बघा!

२० पेक्षा जास्त सुरक्षा फीचर्स!

कंपनीचा दावा आहे की या प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात आली असून २० सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. बिगॉस म्हणाले की, ते केवळ त्याच्या आधुनिक डिझाइननेच ग्राहकांना भुरळ घालणार नाही, तर स्मार्ट बॅटरी आणि मोटर कंट्रोलर यासारख्या उपयुक्त फीचर्ससह देखील आहे. यात पूर्णपणे वॉटरप्रूफ, आयपी ६७ रेटेड इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी आहे, जेणेकरून ती उष्णता आणि धुळीने खराब होणार नाही.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment