लग्नाला 84 वर्ष झाली, 100 हून अधिक नातवंडासह जोडप्याचा वर्ल्ड रेकॉर्ड!

WhatsApp Group

Brazil Couple Longest Marriage Record : प्रेम काळानुसार फिकं पडतं असं म्हटलं जातं, पण ब्राझिलच्या या वयोवृद्ध जोडप्याने ही समजूतच खोटी ठरवली आहे. मनोएल एंजेलिम डिनो आणि मारिया डी सूसा डिनो या दाम्पत्याचं लग्न आज तब्बल 84 वर्षांपूर्वी झालं होतं. आणि आज, इतक्या वर्षांनंतरही त्यांचं प्रेम तितकंच घट्ट आहे. त्यांचं नाव आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये “Longest Living Married Couple” म्हणून नोंदवण्यात आलं आहे.

1936 मध्ये सुरू झाली होती त्यांची प्रेमकहाणी

सेरा (Serra) या ब्राझिलमधील छोट्या शहरात 1936 मध्ये मनोएल आणि मारिया यांची पहिली भेट झाली. त्या क्षणीच मनोएल मारियावर प्रेमात पडले. मात्र त्या काळात कौटुंबिक संमतीशिवाय लग्न करणे मोठं आव्हान होतं. मारियाच्या घरच्यांनी या नात्याला विरोध केला, पण मनोएलनं हार मानली नाही.

त्यांनी स्वतःहून एक छोटं घर बांधलं आणि आपल्या निर्धारानं सगळ्यांना पटवलं. अखेर 1940 साली, एका छोट्याशा चैपलमध्ये त्यांनी लग्नाच्या शपथा घेतल्या, आणि सुरू झाला 84 वर्षांचा अविस्मरणीय प्रवास.

हेही वाचा – Video : मारले सलग 8 षटकार! 11 चेंडूंत फिफ्टी ठोकून केला विश्वविक्रम! सर्वत्र आकाश कुमारची चर्चा

‘मिनी वर्ल्ड’ झालं त्यांचं कुटुंब

आज मनोएल आणि मारियांचं कुटुंब म्हणजे अक्षरशः एक छोटं विश्व आहे. त्यांना 13 मुलं, 55 नातवंडं, 54 पणतू-पणती, आणि 12 पर-पणतू-पणत्या आहेत. इतक्या मोठ्या कुटुंबातही सर्व सदस्य त्यांच्यावर अपार प्रेम करतात.

100 वर्षांहून अधिक वयाचा मनोएल आता मुख्यत्वे विश्रांती घेतो, पण प्रत्येक संध्याकाळी दोघेही एकत्र बसून रेडिओवर रोजरी प्रार्थना ऐकतात, जसं ते 1940 मध्ये ऐकत असत, तसंच आजही.

जगभर व्हायरल झालेली प्रेमकहाणी

‘LongeviQuest’ नावाच्या एका आंतरराष्ट्रीय संस्थेनं या जोडप्याची कथा जगासमोर आणली. ही संस्था शतायुषी लोकांच्या जीवनावर संशोधन करते. त्यांच्या मते, मनोएल आणि मारिया हे सध्या जगातील सर्वात जास्त काळ एकत्र राहिलेलं विवाहित जोडपं आहेत.

ही प्रेमकहाणी केवळ रेकॉर्ड नाही, तर काळालाही हरवणारं एक उदाहरण आहे. 84 वर्षांचं लग्न, परस्परांबद्दलचा आदर, आणि श्रद्धेचं नातं जगभरातील नव्या पिढीसाठी हीच खरी प्रेमाची व्याख्या ठरू शकते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment